‘टेंडर फिक्सिंग’मध्ये भाजप कनेक्शन?
संदीप देशपांडे म्हणाले की, "या संपूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये भाजपशी संबंधित असलेल्या कंपन्यांना सरस ठरवण्यासाठी अटी शर्ती पद्धतशीरपणे रचल्या गेल्या. यामध्ये भाजपचा गुजरातमधील राज्यसभा खासदाराचे कनेक्शन असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. या खासदाराचा मुलगा सनी पांड्या हा बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर तो सातत्याने दिसतो. हे योगायोग नाहीत, हे संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
पूर्वीचे पहारेकरी, आता तिजोरी लुटायला?
"जे पहारेकरी होते, तेच आता तिजोरी लुटायला निघालेत का?" असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी सांगितलं की, "सनी पांड्याचं नाव घेतल्यावर आम्ही थोडा रिसर्च केला. ते गुजरातमधून राज्यसभेत गेलेल्या भाजप खासदारांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता हे स्पष्ट होतंय की टेंडरमध्ये भाजप कनेक्शन आहे."
अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय शक्य नाही
संदीप देशपांडे यांनी म्हटले की, 'निविदांच्या अटी अशा प्रकारे ठरवल्या गेल्या आहेत, ज्या एक विशिष्ट कंपनीच्या फायद्याच्या आहेत आणि हे अधिकारी आणि वरिष्ठ यंत्रणांच्या संमतीशिवाय शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला. संदीप देशपांडे यांनी महापालिका आयुक्त, नगरविकास खाते आणि मुख्यमंत्र्यांकडे याची चौकशी करण्याची मागणी केली.