दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि ITI चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी सीमा रस्ता संघटनेमध्ये नोकरीची संधी आहे. जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ITI चे शिक्षण घेतले असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने 500 हून अधिक पदांसाठी नवीन भरतीसाठी एक संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. भरतीच्या माध्यमातून संस्थेत वाहन मेकॅनिक, MSW पेंटरसह आदी जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. आजपासून म्हणजेच 11 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्जासाठी सुरूवात झालेली आहे.
advertisement
ऑनलाईन अर्जप्रक्रियेला 11 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 24 नोव्हेंबर 2025 असणार आहे. या काळात रिक्त पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार BRO च्या अधिकृत वेबसाइटवर bro.gov.in जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत. 542 जागांवर ही नोकरभरती होणार असून वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू (पेंटर), एमएसडब्ल्यू (डीईएस) या पदांवर ही नोकरभरती होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच मग अर्ज करावा. जाहिरात PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे.
सीमा रस्ते संघटना (Border Road Organization- BRO) ही भारत सरकारची एक लष्करी अभियांत्रिकी संस्था आहे, जी देशाच्या सीमेवरील दुर्गम भूभागात रस्ते, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम आणि दुरुस्ती- देखभाल करण्याचे काम करते. या भरतीच्या माध्यमातून तुम्हीही या संस्थेत सामील होऊ शकता आणि सरकारी नोकरी मिळवू शकता. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. शिवाय उमेदवारांची वयोमर्यादा देखील फॉर्म भरण्यासाठी निश्चित करण्यात आली.
ज्या उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 ते जास्तीत जास्त 25 वर्ष पूर्ण केली असेल ते या भरतीत सहभागी होऊ शकतात. वयोमर्यादेची गणना 24 नोव्हेंबर 2025 च्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वरच्या वयात सूट मिळेल.उमेदवारांची नियुक्ती लेखी परीक्षा, PET, कौशल्य चाचणी/ट्रेड टेस्ट, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय परीक्षा या टप्प्यांद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेऊ शकतात. परंतु त्यासाठी आपल्याला ते योग्य प्रकारे कसे वापरावे हे माहित असणे आवश्यक आहे.