मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडवर ही घटना घडली आहे. डोंबिवली पश्चिम गुप्ते रोडवर शिव मंदिर शेजारी सीमंतिनी इमारत आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही इमारत खचल्याचं सोसायटीतील लोकांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. या इमारतीत जवळपास २५० रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व रहिवासी तातडीने इमारतीतून खाली उतरले आहे.
advertisement
इमारत ही मागील बाजूने खचली. याबद्दल स्थानिकांनी तातडीने डोंबिवली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तातडीने सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. इमारतीतील अनेक रहिवासी हे रस्त्यावर येऊन थांबले आहे. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड शिव मंदिर शेजारी सीमंतिनी को-ऑ हाऊसिंग सोसायटी ही धोकादायक इमारती शुक्रवारी सायंकाळी खचली. 45 वर्ष जुने हे इमारत असून धोकादायक म्हणून पालिका प्रशासनाने घोषित केली होती. या इमारतीत साधारण 24 कुटुंब राहत असून तीन गाळे आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास खचल्या माहितती अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी रहिवाशांनी बाहेर काढलं. सदर सोसायटीत मधील काही रहिवासी पागडीमध्ये राहायचे अशी माहिती स्थानिकांनी दिली, तर रात्री 11.30 प्रभाग क्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोचले, तसंच आमदार राजेश मोरे पोचून या घटनेची माहिती घेतली.