TRENDING:

वरकमाईचा मोह आला अंगलट; 50 हजारांची मागणी, दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात

Last Updated:

 तक्रारदार यांनी 19 हजार रूपये तलाठी डाबेराव यांना दिले आणि उर्वरित 31 हजार रूपये सकाळी आणून देतो असे सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

बुलडाणा : शेगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांनी रेती वाहतुकीचे वाहने कारवाई न करता सोडून देण्याकरता 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात संबंधिताने अँटी करप्शन ब्युरोला कळवून दोघा तलाठ्यांना पुराव्यानिशी पकडून दिले. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अँटी करप्शन ब्युरो अकोलाचे पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर यांनी प्रसारमाध्यमांना कळविल्यानुसार तक्रारदार यांचा चुलतभाऊ यांची एक जेसीबी आणि एक टिप्पर तसेच इतर नातेवाईकाचे एक टिप्पर असे तीन वाहने गौण खनिजाची वाहतूक करत असतात. ग्राम माटरगाव शिवाराचे तलाठी अरूण गुलाबसिंग डाबेराव (57) रा. सावता चौक, जुने महादेवाच्या मंदिराजवळ शेगाव यांनी सदरचे खाली वाहने पकडून तिन्ही वाहने अवैध मुरूम उत्खनन करण्याकरता जात असल्यामुळे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून सदर वाहने शेगाव तहसील कार्यालय येथे लावतो असे सांगितले. जर वाहने सोडून द्यायचे असतील तर त्याकरता 50 हजार रूपये द्या, अशी मागणी तक्रारदाराकडे केली.

advertisement

लाच मागणी पडताळणी

तक्रारदार यांनी 19 हजार रूपये तलाठी डाबेराव यांना दिले आणि उर्वरित 31 हजार रूपये सकाळी आणून देतो असे सांगितले आणि इकडे उपरोक्त गैरप्रकाराची तक्रार अकोला अँटी करप्शन ब्युरो विभागाकडे नोंदविली. त्यानंतर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमाविली असता, आरोपी अरूण डाबेराव यांनी तडजोडीअंती 20 हजार रूपये लाच रकमेची मागणी करून सदरची लाच रक्कम ही आरोपी अमोल गिते, रा. अकोट रोड गिते मळा, शेगाव यांची असल्याचे सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वरकमाईचा मोह आला अंगलट; 50 हजारांची मागणी, दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल