Mahatma Gandhi Jayanti 2025: मुंबईकरांनो, महात्मा गांधीजींचं मुंबईत इथं आहे घर, तुम्ही पाहिलं का? Video

Last Updated:

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान अतुलनीय आहे. या स्वातंत्र्य संग्रामात मुंबईतील मणी भवन या ठिकाणाचं विशेष महत्त्व आहे.

+
News18

News18

मुंबई : आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान अतुलनीय आहे. सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. या स्वातंत्र्य संग्रामात मुंबईतील मणी भवन या ठिकाणाचं विशेष महत्त्व आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.
ग्रँट रोडजवळील शांत गल्लीत वसलेलं मणी भवन 1917 ते 1934 या काळात गांधीजींचं मुंबईतील निवासस्थान होतं. स्वातंत्र्य संग्रामातील सत्याग्रह, असहकार आंदोलन, खेड्यांच्या पुनरुत्थानाच्या योजना यांसारख्या अनेक ऐतिहासिक चळवळींना याच ठिकाणाहून दिशा मिळाली.
आजही हे ठिकाण पर्यटक आणि अभ्यासकांसाठी एक मोठं आकर्षण आहे. देश-विदेशातून इतिहासप्रेमी येथे अभ्यास आणि दर्शनासाठी येतात. गांधीजींशी संबंधित असंख्य वस्तू, दस्तऐवज आणि खुणा येथे जतन करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ऑगस्ट क्रांतीशी संबंधित महत्त्वाच्या घटना आणि संदर्भ येथे पाहायला मिळतात.
advertisement
मणी भवनात गांधीजींच्या दैनंदिन वापरातील वस्तू आजही नीट जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांचा प्रसिद्ध चरखा, तुरुंगवासाच्या काळात वापरलेली कटोरी आणि चमचा, तसेच त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडित साध्या पण ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे.
यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे थ्री-डी मॉडेल्स. या मॉडेल्समधून गांधीजींच्या संपूर्ण जीवनप्रवासातील महत्त्वाच्या घटनांचं प्रत्यक्ष दर्शन घडतं. सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह, ऑगस्ट क्रांती चळवळ, गांधीजींवर झालेला गोळीबार अशा अनेक निर्णायक प्रसंगांची जिवंत मांडणी येथे करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना जणू ते त्या काळात पोहोचले आहेत आणि स्वातंत्र्य संग्रामाचा प्रत्यक्ष भाग आहेत, असा अनुभव मिळतो.
advertisement
स्वातंत्र्य दिनानिमित्त किंवा इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येकाने या ठिकाणाला भेट द्यावी. कारण मणी भवन हे केवळ एक वास्तू नसून गांधीजींच्या संघर्षमय आयुष्याचा आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा साक्षीदार ठरलेलं जिवंत स्मारक आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mahatma Gandhi Jayanti 2025: मुंबईकरांनो, महात्मा गांधीजींचं मुंबईत इथं आहे घर, तुम्ही पाहिलं का? Video
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement