कशी झाली सुरुवात?
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे माझे बालपण आणि शालेय शिक्षण झाले. 2014 मध्ये विवाह झाल्यानंतर शिक्षण थांबले. दुसऱ्या प्रसूतीदरम्यान सातव्या महिन्यातच मुलीचा मृत्यू झाला. पण रुग्णालयातून आल्यावर अवघ्या बारा दिवसांत मी हाती बांबू घेतला. मन स्वस्थ बसू देत नव्हते. चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात मी प्रशिक्षणासाठी रुजू झाले. दरम्यान, अशक्तपणामुळे कित्येकदा भोवळ येऊन देखील मी पडले. पण त्यातून सावरत मी माझ्या मार्गावर चालत राहिले. आज माझे यश आणि एकंदरीत प्रवास बघून मला फार समाधान वाटतं आहे, अशी भावना मीनाक्षी वाळके व्यक्त करतात.
advertisement
उपलब्ध संधीचे केले सोने
गडचिरोली भामरागड, चंद्रपूर आदी ठिकाणच्या परिघात बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. साधारणतः पाच वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात बांबूपासून कलाकृती तयार करण्याची कल्पना आली आणि मी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कालांतराने यात सुधारणा होत गेली. अनेक तंत्रज्ञान आणि मशीनच्या साह्याने मी आज नाविन्यपूर्ण कलाकृती घडवत आहे. माझ्यासह समाजातील अनेक गरजू घटकापर्यंत या उद्योगातून रोजगार निर्मिती होत आहे. महिला सबलीकरण, आत्मनिर्भर महिला यासाठी आज हा उपक्रम अनेकांसाठी वरदान ठरला आहे, असे मीनाक्षी सांगतात.
इंग्लंडच्या संसदेत पुरस्कार
मीनाक्षी यांनी तयार केलेल्या बांबूच्या वस्तूंना जगभरात मागणी आहे. त्यामुळेच त्यांची जगभरात वेगळी ओळख निर्माण झालीय. इंग्लंडची संसद हाउस ऑफ कॉमन्समध्ये आयआयडब्लूशी इंस्पिरेस अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या मीनाक्षी वाळके या भारतातील पहिल्या बांबू कलावंत आहेत. 'द बांबू लेडी ऑफ इंडिया' म्हणून त्यांना गौरवण्यात आलं आणि तीच त्यांची ओळख बनलीय.
डोंबिवलीकर तरुणाचा अनोखा छंद, हेमा मालिनीसह अनेक सेलिब्रिटींना भूरळ
बांबू राख्यांना देशविदेशातून मागणी
कुठलाही वारसा किंवा पाठबळ नसताना मीनाक्षी वाळके यांनी अभिसार इनोव्हेटिव्ज नावाचा सामाजिक उद्योग सुरू केला. झोपडपट्टीतील ग्रामीण भागातील मुली आणि बायकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देता देता त्यांचे काम वाढत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे हा त्यांचा हेतू आहे. रक्षाबंधनाच्या काही महिने आधी या महिलानी राख्या बनवण्याच्या कामाला सुरुवात केली होती . त्या बांबूच्या राख्यांचे काम घरूनही करतात. या राख्यांना देशविदेशातून मागणी आहे. इंग्लंड, स्वीडन, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स आणि स्वित्झलँड अशा देशांत बांबूच्या राख्या पोहोचल्या आहेत. स्वित्झर्लंडच्या सुनीता कौर यांनी मीनाक्षी यांच्या बांबू राखीसह इतरही वस्तू तेथे विक्रीकरता मागवल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
10 कोटीच्या पुलाला लाकडाचा आधार; जीवघेण्या प्रवासा विरोधात गावकरी एकवटले PHOTOS
बांबू कौशल्याची जगाला भुरळ
गरीब आदिवासी महिलांना रोजगार मिळावा म्हणून मीनाक्षी यांनी बाबू राखीचे नवनवे प्रयोग केले. लंडन, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा देशात बांबू राखी पोहोचली. त्यांच्या अद्भुत कौशल्याची भुरळ इस्रायल देशाला पडली. जेरुसलेम येथील कला शाळेने त्यांना शिकविण्याचे निमंत्रण दिले. काही कारणांमुळे त्या जाऊ शकल्या नाहीत. मात्र, कॅनडाच्या इंडो कॅनडियन आर्ट्स अॅण्ड कल्चरल इनिशिएटिव्ह संस्थेचा वूमन हीरो पुरस्कार मिळाला. मीनाक्षी यांनी सिट 2011 या जागतिक सौंदर्य स्पर्धेचा मुकूट बांबूपासून तयार करून दिला.
दरम्यान, मीनाक्षी वाळके यांचा प्रवास अंगावर काटे आणतो. शिवाय खचलेल्यांना देखील प्रेरणा देतो. आज त्यांच्या माध्यमातून असंख्य महिलांना बांबू कलाकृतीचे प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे. शिवाय भारतीय कलाकृती देशाच्या सीमा ओलांडून जात आहेत. हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.