निशा ही छत्रपती संभाजीनगरातील निमाई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती, तर गणेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सुटीचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी दोघे गावाकडे येत होते. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून तडफडत असलेल्या भावंडांना महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र दोघांचेही प्राण वाचवणे शक्य झाले नाही. या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित मोठी बहीण असा परिवार आहे.
advertisement
घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, अपघात रात्री घडूनही वडोद बाजार पोलिस सकाळी उशिरा घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस रात्री घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असते तर चौकशी झाली असती, आणि आरोपीला ताब्यात घेणे सोपे झाले असते, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.






