छत्रपती संभाजीनगर-पुणे विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदन औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे चेअरमन सुनीत कोठारी यांनी लोहगाव येथे एअर कमोडोर यांना दिले आहे. फ्लाय 91 चे एटीआर 71-600 दिवसातून 2 वेळा सेवा सुरू करण्यासाठी तयार आहे.
वय अवघे साडेसात वर्षे, अर्णवीने केली कमाल, 2500 फूट उंचीवरील शिखर केले सर, Video
advertisement
नव्या विमानसेवेसाठी छत्रपती चिकलठाणा विमानतळावर स्लॉट उपलब्ध संभाजीनगरच्या आहे. मात्र पुण्यातील लोहगाव विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे पुणे विमानतळाच्या संचालकांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. हवाईदलाने स्लॉट उपलब्ध करून दिल्यास विमानातून पुण्याला जाण्याची सोय होईल.
पुणे विमानतळ हवाई दलाचे असल्याने येथे स्लॉट उपलब्ध नाहीत. देशभरातून पुणे शहरासाठी मोठ्या प्रमाणावर हवाईसेवा असून अनेक शहरांतून सेवेसाठी मागणी होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 24 तासांत 100 विमानांची सेवा असल्याने अतिरिक्त स्लॉट शिल्लक नाही. सुखोई विमानांचा सराव नियमित असल्याने नागरी वाहतुकीवर बंधने आहेत.






