छत्रपती संभाजीनगर शहरातील यशवंत कला महाविद्यालय येथील कलादालन आर्ट गॅलरी मध्ये रूट्स ॲन्ड थोर्डस 2025 हे यशवंत कला महाविद्यालयाचे विद्यार्थी राजकमल सुंदरमल आणि नेहा गायकवाड यांचे चित्र आणि मांडणी शिल्पाचे कला प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या दोन विद्यार्थ्यांनी अगदी टाकाऊ पासून सुंदर अशा पद्धतीने हे प्रदर्शन भरवले आहे.
advertisement
माणुसकी सेवालय! बेवारसांना अन् निराधारांना देते आधार, पंडित दाम्पत्य घेते विशेष काळजी, Video
राजकमल सुंदरमल या विद्यार्थ्याने वृक्षतोड कशी होत आहे आणि वृक्ष वाचवण्यासाठी कशी धडपड करत आहेत, ही कलाकृती त्यांनी सादर केलेली आहे. त्यासोबतच त्याने असा संदेश दिला आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे आणि आपण या वृक्षांसोबत जोडलेले आहोत आणि जर भविष्यात सर्व वृक्ष नष्ट झाले तर याचा सर्वांवरच वाईट परिणाम होईल त्यामुळे मी ही कलाकृती सादर केलेली आहे, असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.
नेहा गायकवाड या विद्यार्थिनीने जे आपण कपडे टाकून देतो त्या कपड्यांपासूनचे सुंदर असे गालिचे आणि इतरही सुंदर अशा वस्तू तयार केल्या आहेत. यातून तिने हे संदेश देण्याचं काम केलं आहे की जे टाकाऊ कपडे आहेत त्यापासून पण देखील आपण सुंदर कलाकृती तयार करू शकतो आणि यामुळे कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाला नुकसान होणार नाही, असं तिने सांगितलं आहे.





