ड्रेनेजसाठी सुमारे पाच फूट खोल चारी खोदण्यात आली होती. खोदकामातून काढलेली माती आणि दगड चारीच्या अगदी कडेला साठवून ठेवण्यात आले होते. काम सुरू असतानाच हा मातीचा ढिगारा अचानक ढासळला आणि काही क्षणांत महेश पूर्णपणे मातीखाली दबला गेला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी घाबरलेल्या अवस्थेत माती बाजूला करत महेशला बाहेर काढले आणि तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
advertisement
मला आई बनवा अन् 25 लाख मिळवा! घरबसल्या कमाईचा फंडा, ‘प्रेग्नन्सी जॉब’ने अनेकांना गंडा
आई, लवकरच पैसे पाठवतो...
मंगळवारी सकाळीच महेशने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. 'आई, लवकरच घरी पैसे पाठवतो,' असे तो आईला म्हणाला होता. त्याच्या घरी गुजरातमध्ये आई, वडील व एक भाऊ आहे. कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे स्वप्न घेऊन तो शहरात कामाला आला होता. कासंबरी दर्गा भागात ड्रेनेजसाठी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे 5 फूट खोल चारी खोदण्याचे काम सुरू होते. त्या चारीत महेश काम करत होता.
दरम्यान, चारी खोदून उपसलेली माती, दगड चारीलगत न टाकता काही अंतरावर टाकले असते तर दुर्घटना टळली असती.






