21 वर्षीय साक्षी (नाव बदलले आहे) कुटुंबासह चिकलठाणा ठाण्याच्या हद्दीत राहते. काही महिन्यांपूर्वी तिची हेमंत काकड या सातारा परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते सतत संपर्कात होते. मात्र, काही दिवसांत साक्षीला त्याचे वागणे, त्रास खटकायला लागला. एकतर्फी प्रेमातून हेमंतने तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
छत्रपती संभाजीनगर हादरलं! वाढदिवसामुळे मामाच्या घरी आले अन् मामीवर केला अत्याचार, मामाचाही सहभाग
आरोपीने मुलीला 'तुझे लग्न होऊ देणार नाही, झाल्यावर तुझ्यासह होणाऱ्या पतीला जिवे मारून टाकीन' अशी थेट धमकी दिली. याव्यतिरिक्त काकडने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. या सर्व त्रासाला कंटाळून साक्षीने चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
मुलीचा आणि भावाचा पाठलाग
21 वर्षीय साक्षी शहरात बारावीचे शिक्षण घेत होती. तिचे डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी ती एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ची तयारी करत होती. मात्र, याच कॉलेजमधील आरोपी हेमंत काकड याने एकतर्फी प्रेमातून तिचा पाठलाग करून तिला प्रचंड त्रास दिला. काकडच्या त्रासामुळे मुलीचे कुटुंब प्रचंड दहशतीत आले. काकड स्वतः तिचा पाठलाग करायचा तसेच साथीदारांना तिच्या भावाचाही पाठलाग करण्यास सांगायचा.
कुटुंबानं घर सोडलं
मुलीचे वडील व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. कुटुंब तीन महिन्यांपूर्वी चिकलठाणा भागात वास्तव्यास होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी शहराबाहेर हिरापूर शिवारात राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुलीला नाइलाजाने आपले कॉलेज आणि क्लासेसला जाणे बंद करून शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाने घर बदलूनही काकडने पाठलाग सोडला नाही. परिणामी तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले.
या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत. पोलिसांनी आरोपीची बुलेट आणि मोबाइल जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. आरोपी काकडवर यापूर्वी सातारा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद असल्याचेही समोर आले आहे.






