छत्रपती संभाजीनगरातील शांता आसाराम शिंदे या वृद्धा आपल्या नातवासह पाच वर्षांपासून बेगमपुऱ्यातील तारकस गल्लीतील ॲड. संजय डोंगरे यांच्या घरात राहतात. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर शिवप्रसाद शर्मा हे मुलगा मयूर याच्यासह वास्तव्यास आहेत.
PSI चं ट्रेनिंग पूर्ण झाल्याची पोस्ट अन् 24 तासांत..., आता तुरुंगात जाण्याची वेळ, काय घडलं?
घटनेच्या रात्री शांता शिंदे घरातील कामे आटोपून आपल्या मुलीकडे जाण्यासाठी बाहेर पडत होत्या. त्याच वेळी मयूर त्यांच्या घरात आला. 'मला बाहेर जायचे आहे, तू बाहेर निघून जा' असे म्हणून शांता यांनी त्याला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग मनात धरून दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
रागाच्या भरात मयूरने ‘तुमचे घर जाळून टाकतो’ अशी धमकी दिली. थोड्याच वेळात घरातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. तातडीने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत घरातील सामान भस्मसात झाले होते. या प्रकरणी संशय व्यक्त करत शांता शिंदे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मयूर शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.






