छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या 4 एक्स्प्रेस आता सिकंदराबाद रेल्वे स्थानक वगळून धावणार आहेत. याबाबत नियोजनासाठी रेल्वे बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेला 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्याचा फटका रोज शहरातून हैदराबादला जाणाऱ्या 8 हजारांहून अधिक प्रवाशांना बसणार आहे. सध्या सहापैकी चार गाड्या सिकंदराबादहून जातात. त्यातील अजंता एक्स्प्रेसला अत्यल्प कोटा असून तिला सिकंदराबाद येथे थांबा नाही. देवगिरी व गुंटूर एक्स्प्रेस गैरसोयीच्या ठरत असून 4 गाड्यांचा मार्ग बदलल्याने शहरातील प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.
advertisement
FASTag सक्ती योग्यच! हायकोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार, पुणेकराची याचिका फेटाळली
सध्या नरसापूर नगरसोल (12787), नरसापूर नगरसोल (17231), साईनगर शिर्डी-मछलीपट्टणम (17207), साईनगर शिर्डी- काकीनाडा (17205) या साप्ताहिक एक्स्प्रेस सिकंदराबाद स्थानकावरून धावतात. त्यांना भविष्यात सिकंदराबाद वगळून चालवण्यास रेल्वे बोडनि मान्यता दिली आहे. त्यामुळे आता संबंधित रेल्वे चारलापल्ली व मौलाअली जी कॅबिन स्थानकावरून जाणार आहेत. सिकंदराबाद स्थानकापासून हे अंतर 8 किमी आहे. सध्या दररोज छत्रपती संभाजीनगर ते सिकंदराबाद 3 रेल्वे धावतात. सोमवारी 3 अतिरिक्त गाड्या धावत असून बुधवारी सर्वाधिक 5 साप्ताहिक रेल्वे असतात.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून तिरुपतीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोज 3 रेल्वे तिरुपतीला जात असतात. तर अनेकजण सिकंदराबाद येथून कनेक्टिंग रेल्वेने तिरुपतीला जात असतात. आता सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील 8 हजार प्रवाशांना तर जालना, परभणी येथून दर दिवशी 12 हजार प्रवाशांना फटका बसेल.
नियमित रेल्वे
- संभाजीनगर-गुंटूर संभाजीनगर-गुंटूर निघण्याची निघण्याची वेळ दुपारी 4.15 वाजता असून सिकंदराबादला सकाळी 5.28 वाजता पोहोचेल.
- देवगिरी एक्सप्रेस संभाजीनगराहून सकाळी 4.20 वाजता निघते आणि सिकंदराबादला पोहोचते दु. 4.20 वाजता पोहोचते.
- अजंता एक्स्प्रेस संभाजीनगराहून रात्री 10.45 वाजता निघते आणि काचीगुडाला सकाळी 9.45 वाजता पोहोचते.