ज्ञानेश्वर शिरसाट हे पत्नी आणि मुलीसह शहरात राहत होते. त्यांच्या भाचीचे शिक्षण विद्यापीठात सुरू असून तिला वसतिगृहात सोडून ते परत येत होते. परतीच्या मार्गावर समोरून येणाऱ्या (एमएच 20 एचएच 8252 या) कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीवर आदळली. कारचा वेग इतका प्रचंड होता की ज्ञानेश्वर आणि त्यांची चार वर्षांची मुलगी रस्त्यावर दूरवर फेकले गेले.
advertisement
लग्नाला जाताना काळ आडवा, लेकीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा करुण अंत, छ. संभाजीनगरची घटना
भरधाव कारची धडक बसताच ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. तिच्या मेंदूला गंभीर मार बसल्याची माहिती मिळते. अपघातानंतर बेगमपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतले आणि कार जप्त केली.
गर्भवती पत्नीची व्याकूळ प्रतीक्षा
अपघाताच्या रात्री ज्ञानेश्वर यांच्या गर्भवती पत्नी घरी त्यांची आणि मुलीची वाट पाहत शांतपणे बसल्या होत्या. नेहमीच्या वेळेपेक्षा पती उशिरा येत असल्याने त्यांना काळजी वाटू लागली होती. मात्र बाहेर नेमके काय घडले आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. दरम्यान, अपघाताची बातमी त्यांच्या नाजूक परिस्थितीत असलेल्या पत्नीला नेमकी कशी सांगावी? असा भावनिक पेच नातेवाईकांसमोर निर्माण झाला होता.
चार दिवसांपूर्वीच खरेदी केली कार
अपघातानंतर बेगमपुरा पोलिसांनी तत्काळ कारचालक शेख करीम शेख (वय 39. रा. कुंभार गल्ली, बेगमपुरा) याला अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस तपासात उघड झाले की अपघातात सहभागी असलेली कार त्याने अवघे चार दिवसांपूर्वीच विकत घेतली होती. नवीन कारचा आनंद घेण्याच्या नादात वेगाने वाहन चालवणे अखेर एका निरपराधाच्या जीवावर उठल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.






