बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन डॉ. कराड यांनी विविध रेल्वे विषयक मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मार्गांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना गती देण्याची गरज असल्याचे डॉ. कराड यांनी अधोरेखित केले.
रेल्वे मराठवाड्याला, पण फायदा कुणाला? तिरुपती दर्शनाचा मार्ग खडतर, नेमका काय झालाय गोंधळ?
advertisement
नवी वंदे भारत सुरू करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच छत्रपती संभाजीनगरला स्वतंत्र रेल्वे विभागाचा दर्जा देऊन तो मध्य रेल्वेअंतर्गत समाविष्ट करावा, अशी भूमिका मांडण्यात आली. यावर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतंत्र रेल्वे विभागाच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
विकासाला चालना
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या सुमारे 85 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सहा महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. हा मार्ग पुढे पुण्यापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही डॉ. कराड यांनी दिली. या सर्व प्रकल्पांमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण सुलभ होऊन औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






