छत्रपती संभाजी नगर शहरातील सावरकर चौकात एका बेजबाबदार चालकाने थेट कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात 19 मे रोजी दुपारी 12:30 वाजता घडला. अपघातात 68 वर्षीय अशोक लक्ष्मीनारायण अमृते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना 21 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यातील अजब लग्नाची गजब स्टोरी! स्वतःचा हॉल सोडून हिंदू कपलने मुस्लिम कपलसोबत केलं लग्न
advertisement
अशोक अमृते हे पत्नीसमवेत नवजीवन कॉलनीत राहत होते. एका कारचालकाने (एमएच 20 सीएच 3423) बेजबाबदार पणे रस्त्यावरच आपली चारचाकी उभी केली. तसेच मागेपुढे न बघता कारचा दरवाजा अचानक उघडला. दरवाजा अचानक उघडल्याने मागून येत असलेल्या अशोक यांची दुचाकी थेट दरवाजावर जाऊन आदळली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळून डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर कारचालक व स्थानिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 21 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशोक अमृते हे बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची मुलगी परदेशात राहते. या घटनेनंतर अशोक यांचे पुतणे प्राध्यापक मनिष अमृते यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भोवनेश्वर रामदास पाटील (रा. बजाजनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक रमेश कंदे करत आहेत.