TRENDING:

चूक कुणाची? एकाची कार दुसऱ्याला विकली अन् चालवताना तिसऱ्याचा मृत्यू, छ. संभाजीनगरात धक्कादायक प्रकार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: या प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला धडक. जानेवारी 2026 मध्ये भीषण अपघात झाला होता. यात 17 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला. आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी ऋषिकेश किशोर येवतकर (वय 23, रा. सुंदर कॉलनी, जोगेश्वरी) याच्याविरोधात दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चूक कुणाची? एकाची कार दुसऱ्याला दिली अन् तिसऱ्याचा मृत्यू, छ. संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
चूक कुणाची? एकाची कार दुसऱ्याला दिली अन् तिसऱ्याचा मृत्यू, छ. संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
advertisement

‎साजापूर परिसरातील 17 वर्षीय यश (नाव बदलले) हा 9 जानेवारी रोजी करोडी शिवार परिसरात कार चालवत होता. तेव्हा त्याने वेगात जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पहिलं प्रेम जीवावर उठलं, ‘तो’ कोयता घेऊन कॉलेजला आला अन्..., मुंबईच्या घटनेनं खळबळ

advertisement

‎या घटनेनंतर करण्यात आलेल्या तपासात आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये समोर आले की, संबंधित कार शेख लतिफ शेख अब्दुल रहेमान (वय 56) यांच्या मालकीची होती. त्यांनी 16 डिसेंबर 2025 रोजी ती कार नंदनवन कॉलनीतील विजय गनराज यांना विकली होती. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी ही व्यवहार प्रक्रिया पूर्ण झाली. पुढे 9 जानेवारी रोजी हीच कार ऋषिकेश येवतकरकडे होती आणि त्याने आपल्या परिचयातील अल्पवयीन यशला ती चालविण्यास दिली. त्यातून हा अपघात झाला आणि यशचा जीव गेला.

advertisement

‎या प्रकरणात शासनाच्या वतीने पोलिस अंमलदार विठ्ठल खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश येवतकर तसेच संबंधित प्रकरणात यशविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.

‎कोणते गुन्हे दाखल?

‎या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 106(1) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), कलम 281 (सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे), तसेच कलम 324(4) (आगळीकता) आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कलम 5/180 (परवाना नसलेल्या किंवा अल्पवयीन व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

‎या कलमान्वये दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यासोबतच संबंधित वाहनाची नोंदणी निलंबित करण्याची तरतूदही आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चूक कुणाची? एकाची कार दुसऱ्याला विकली अन् चालवताना तिसऱ्याचा मृत्यू, छ. संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल