सोयगाव तालुक्यातील शिवाजीनगर गलवाडा (अ) येथे दिव्या अतुल सोनवणे ही विद्यार्थिनी राहते. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. थोड्या वेळानंतर तिच्या कुटुंबीयांची आरडाओरड झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. दिव्याला खाली उतरवून सोयगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
advertisement
बेजबाबदारपणाचा कहर! कारचा दरवाजा उघडला, चूक नसताना दुचाकीस्वाराचा जीव गेला!
शाळेत दुसरा क्रमांक
दिव्या सोनवणे ही संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होती. यंदा तिने 74.67 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला होता. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयात डिजिटल फ्लॅश लावण्यात आला होता. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिव्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.