TRENDING:

ऐन पावसाळ्यात पाणीबाणी, छ. संभाजीनगरमध्ये आधीच 7 दिवसआड पुरवठा, त्यात विजेचा खोळंबा!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: ऐन पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांना सात दिवसआड पाणी मिळत आहे. अशातच वीजपुरवठा खंडित झाला असून पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहराला ऑक्टोबरपर्यंत एक दिवसाआड पाणी देण्याची योजना जाहीर झाली आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना सातव्या दिवशी पाणी मिळत आहे. त्यातच रविवारी झालेल्या पावसामुळे फारोळा पंपगृहातील वीजपुरवठा खंडित झाला असून तब्बल 8 तास पाणीपुरवठा थांबवावा लागला. याचा थेट परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला आहे.
‎पावसामुळे वीज बंद; शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाने ढासळला<br>‎
‎पावसामुळे वीज बंद; शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाने ढासळला<br>‎
advertisement

‎शुक्रवारी सिडको परिसरात वीज बंद केल्यामुळे तेथील पाणीपुरवठ्याचा क्रम एक दिवसाने पुढे गेला. जायकवाडी धरण भरलेले असले तरी दसऱ्याच्या तोंडावर नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, हे दुर्दैवी वास्तव आहे. ‎सिडको, हडको, चिकलठाणा, चौधरी कॉलनी, गारखेडा, उल्कानगरी, रोशन गेट, कटकट गेट, किराडपुरा, दिल्ली गेट आणि अन्य परिसरांत पाणीपुरवठा टप्पा नियोजित वेळेपेक्षा उशिराने झाला. जुने शहर आणि उस्मानपुरा भागातसुद्धा पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

advertisement

'पांढरं सोनं काळं पडलं, आता काय करू..?', चिखलात बसून शेतकऱ्याचा आक्रोश, Video

‎दरम्यान, 2500 मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी जोडण्यासाठी 12 सप्टेंबरपासून 5 दिवसांचा शटडाऊन जाहीर केला होता. परंतु, सततच्या पावसामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता नवरात्रौत्सवानंतर पुन्हा 5 दिवसांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे, त्यामुळे पुढील काही दिवस पाणीपुरवठा आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

advertisement

‎“पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी उशिराने पोहोचले. चिकलठाणा, चौधरी कॉलनी, विठ्ठलनगर अशा भागांमध्ये पाणीपुरवठा एक दिवस उशिराने झाला. मात्र उद्यापर्यंत सर्व भागात पाणी वेळेवर पोहोचेल. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे मनपाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऐन पावसाळ्यात पाणीबाणी, छ. संभाजीनगरमध्ये आधीच 7 दिवसआड पुरवठा, त्यात विजेचा खोळंबा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल