छत्रपती संभाजीनगर : भारतात मानल्या जाणाऱ्या 64 कलांपैकी एक कला म्हणजे चित्रकला होय. आपल्या कुंचल्याच्या जादूने अनेकांना भुरळ घालणारे दिग्गज चित्रकार आपल्याकडे घडले. अशाच एका छत्रपती संभाजीनगरमधील चित्रकाराने भौगोलिक सीमेच्या भिंती ओलांडल्या आहेत. प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन थेट चीनमधील जगप्रसिद्ध संग्रहालयात होणार आहे. 6 जून ते 14 जून या कालावधीमध्ये हे प्रदर्शन बीजिंगमधील गुओ चूआंग कला संग्रहालयात होईल.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील यशवंत कला महाविद्यालयाचे रवींद्र तोरवणे हे प्राचार्य आहेत. रवींद्र तोरवणे सांगतात की, "माझे वडील हे कलाशिक्षक होते. त्यामुळे मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे मी चित्र काढायला सुरुवात केली. विविध प्रकारची चित्रे रेखाटली. आता आठ चित्रांची निवड चीनमधील बीजिंगच्या गुओ चूआंग कला संग्रहालयातील प्रदर्शनामध्ये करण्यात आलेली आहे. इथे विविध देशांतील चित्रकार उपस्थिती लावणार आहेत."
लातूरच्या शर्वरीला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण, पाहा काय आहे यशाचा मूलमंत्र?
जगभरातील 19 चित्रकारांचा सहभाग
तोरवणे यांनी दिल्ली येथील एका आर्ट ग्रुपला त्यांची ही चित्रे पाठवली होती. त्यांनी ही चित्रे पुढे बीजिंग येथील संग्रहालयाला पाठवली होती. त्यांच्या या चित्रांची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनामध्ये बांगलादेश, चीन, साउथ कोरिया आणि भारत या देशातील 19 कलाकारांच्या कलाकृतींची निवड करण्यात आलेली आहे, असे तोरवणे सांगतात.
चक्क सापानेच बदलला रंग, नागपुरात दिसला पांढरा तस्कर, संशोधकांनी सांगितलं कारण
कशी आहेत चित्रे?
संपूर्ण चित्रे कॅनव्हास पेपर वरती आणि ऍक्रेलिक रंगाने काढलेली आहेत. त्यांना एक चित्र काढण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागला. तर सर्व चित्रे रेखाटण्यासाठी 15 ते 16 दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यांनी ही सर्व चित्रे ग्रामीण भागातील निसर्गातील काढलेले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्यांनी खास चित्रे रेखाटली. त्यांची निवड 6 जून ते 14 जून या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासाठी झाली आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या ठिकाणी माझ्या चित्राचे प्रदर्शन भरणार आहे, याचा मला खूप अभिमान आहे. भविष्यात मला माझ्या चित्रांचे प्रदर्शन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरूच ठेवयाचे आहे. त्यांना देखील आपली भारतीय संस्कृती कळाली पाहिजे. यासाठी माझे प्रयत्न असल्याचेही तोरवणे यांनी सांगितले.