रविवारी पोलिसांनी केलेल्या चौकशीत कल्पनाने स्वतःला आयएएस असल्याचे सांगून अनेकांना भ्रमित केल्याचे समोर आले. तिचे अफगाणिस्तानचा नागरिक असलेल्या मोहम्मद अशरफ खिल याच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याचे पोलिसांना कळले. याच प्रकरणात दहशतवादविरोधी पथकही तपासात उतरले आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दाखल केलेल्या पुराव्यांवर न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयातसुद्धा कल्पना आक्रमक वर्तन करत असल्याचे सांगितले जाते. वकिलांना ‘पाचपट फी देईन’ असे तिने मोठमोठे दावेही केले.
advertisement
‘कल्पना भागवत’चा अफगाणी बॉयफ्रेंड 7 वर्षांपासून भारतात, चौकशीतून धक्कादायक कांड समोर
घरझडती दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली. तिच्या फोनमध्ये पेशावर कँटोन्मेंट बोर्ड व काही अधिकाऱ्यांच्या नावाने नंबर सेव्ह होता. पाकिस्तानातील व्यक्तींशी चॅट, ज्यातील काही संदेश अचानक डिलिट केले गेले आहेत. अशरफच्या भावाचा व्हिसा नाकारूनही त्याचे पासपोर्ट-व्हिसाचे फोटो तिच्या मोबाइलमध्ये कसा आला हा प्रश्न आहे. खात्यात यावर्षी अचानक वाढलेली 32 लाखांची रक्कम आणि पाच वेळा देशांतर्गत विमान प्रवास केला आहे. ते कोणाला भेटण्यासाठी केला याचा शोध सुरू आहे.
अब्जावधींचे धनादेश: दोन रहस्यमय नावे
कल्पनाच्या घरातून कॉसमॉस बँकेचे दोन धनादेश आढळले. चेतन भानुशाली नावावर 19 कोटी आणि निखिल भाकरे नावावर 6 लाखांचा धनादेश आहे. या व्यक्ती कोण? कल्पना याबाबत काहीही सांगायला तयार नसल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
नातेसंबंधाचा दावा
अशरफसोबत तिची पहिली भेट एसएफएस मैदानावर झाल्याचे समजते. तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक वाढली. तिच्या फोनमध्ये अशरफचा नंबर ‘माय लव्हली हजबंड’ नावाने सेव्ह होता. त्यामुळे ती त्याला प्रत्यक्ष नव्हे, पण मनाने पती मानत असल्याचे अनुमान पोलिसांनी वर्तवले आहे.
गृहमंत्रालयाच्या ओएसडीचा नंबरही सेव्ह
तिच्या मोबाइलमध्ये ‘ओएसडी टू होम मिनिस्टर’ म्हणून अभिषेक चौधरी नावाचा एक नंबर आढळला; मात्र कल्पना अटकेत गेल्यानंतर तो नंबर तात्काळ स्विच ऑफ झाला. प्रियकर अशरफ दिल्लीहून गायब झाला असून त्यासाठी पोलिसांचे एक पथक शोध मोहीम सुरू करणार आहे.






