अफगाणी बॉयफ्रेंड, बड्या नेत्यांसोबत फोटो, ‘5 स्टार’मध्ये राहणाऱ्या महिलेचं पाक कनेक्शन, छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या महिलेच्या तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तिचा बॉयफ्रेंड अफगाणी असून पाकिस्तान कनेक्शनमुळे खळबळ उडाली आहे.

अफगाणी बॉयफ्रेंड, बड्या नेत्यांसोबत फोटो, ‘5 स्टार’मध्ये राहणाऱ्या महिलेचं पाक कनेक्शन, छ. संभाजीनगरात खळबळ
अफगाणी बॉयफ्रेंड, बड्या नेत्यांसोबत फोटो, ‘5 स्टार’मध्ये राहणाऱ्या महिलेचं पाक कनेक्शन, छ. संभाजीनगरात खळबळ
‎छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दीर्घकाळ मुक्काम करून चर्चेत आलेल्या एका महिलेच्या चौकशीने खळबळ उडाली आहे. कल्पना भागवत असे या 45 वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या बँक खात्यात वर्षभरात तब्बल 32 लाख जमा झाले. मात्र आता फक्त 1100 रुपये शिल्लक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या अफगाणी प्रियकराचा भाऊ पाकिस्तानात राहतो आणि या दोघांकडूनच मोठी रक्कम तिच्या खात्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी एसएफएस मैदानावर ड्रायफ्रूट्सचे प्रदर्शन भरले होते. मूळचा अफगाणिस्तानचा असणाऱ्या अशरफ खलीलने तिथे स्टॉल टाकला होता. त्याच वेळी कल्पना त्याला भेटली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पासपोर्ट, व्हिसा आणि देशाच्या मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो तिच्या मोबाईलमध्ये आढळले आहेत. त्यामुळे ती परदेशी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा तीव्र संशय यंत्रणांना आहे.
advertisement
‎अफगाणी बॉयफ्रेंड, पाकिस्तानी भाऊ
‎शहरातील हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये सहा महिन्यांपासून वास्तव्य करणाऱ्या कल्पना भागवतच्या चौकशीतून तिचा बॉयफ्रेंड अशरफ खलील अफगाणिस्तानात तर त्याचा भाऊ आबेद पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघा भावांच्या खात्यातून मोठ्या रकमा कल्पना भागवतच्या खात्यात जमा झाल्या आहेत.
advertisement
मोबाईलमधील पुरावे
कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये अशरफ आणि आबेद यांचे पासपोर्ट व व्हिसाचे फोटो सापडले आहेत. तसेच, पाकिस्तानातील आबेदने भारतात येण्यासाठी तयार केलेल्या अर्जाचा फोटोही तिच्या फोनमध्ये आहे. गेल्या वर्षभरात तिच्या खात्यात तब्बल 32 लाख रुपये जमा झाले होते. मात्र, त्यापैकी आता केवळ 1100 रुपये शिल्लक आहेत, असेही तपासातून पुढे आले आहे. ‎या गंभीर बाबींमुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या घेऱ्यात आले आहे. तिच्या मोबाईलमध्ये अफगाणिस्तानसह अन्य काही देशांतील फोन नंबर्सही आढळून आले आहेत.
advertisement
‎पोलिस यंत्रणेने या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केल्यानंतर सोमवारपासून (24 नोव्हेंबर) एटीएस (दहशतवादविरोधी पथक) आणि आयबी (गुप्तचर यंत्रणा) यांनी तिची चौकशी सुरू केली आहे. ती परदेशी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रभारी पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनीही या तपासाचा आढावा घेतला आहे.
advertisement
अटकेचे कारण
सिडको पोलिसांनी केलेल्या तपासणीत कल्पना भागवतच्या आधार कार्डमध्ये खाडाखोड आढळली होती. तसेच, तिने पोलिसांच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती.
राष्ट्रपतींसोबत फोटो
पोलिसांनी जप्त केलेल्या कल्पनाच्या मोबाईलमध्ये देशातील अनेक मोठ्या नेत्यांसोबतचे तिचे फोटो आणि त्यांचे संपर्क क्रमांक सापडले आहेत. विशेषतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही तिचे फोटो आहेत. यापूर्वी 2021 मध्येही शरद पवार यांच्या ताफ्यात विनापरवाना शिरल्याने तिला एटीएसने ताब्यात घेतले होते, परंतु चौकशी करून तिला सोडून देण्यात आले होते.
advertisement
पोलीस व्हॅनमध्ये पुढे बसणार
‎सिडको पोलिस ठाण्यातून महिलेला पडेगाव परिसरातील तिच्या घराच्या झडतीसाठी नेत असताना एक विलक्षण घटना घडली. आरोपीला पोलिस व्हॅनमध्ये मागच्या सीटवर बसवले जाते, मात्र कल्पना भागवतने थेट 'मी पुढे बसणार' असे फर्मान सोडले. तिच्या या वागण्यामुळे सर्वच पोलिस कर्मचारी अवाक झाले. कल्पनाचे घर पडेगावातील चिनार गार्डनमध्ये होते, जे तिच्या वडिलांनी 2005 मध्ये खरेदी केले होते. वडिलांच्या निधनानंतर 2020 पर्यंत ती आईसोबत तिथे राहत होती, पण नंतर त्या शहरात भाड्याने रूम करून राहत होत्या.
advertisement
विद्यापीठात नोकरी अन् कारवाई
कल्पनाने 2013 मध्ये विद्यापीठात पदवी आणि टायपिंगच्या आधारावर आस्थापना विभाग व विद्यार्थी कल्याण विभागात काही काळ काम केले होते, परंतु न सांगता गैरहजर राहिल्याने विद्यापीठाने तिला कामावरून काढले होते. तिला मोठेपणा दाखवण्याची सवय होती आणि वर्किंग स्टेटस दाखवण्यासाठी तिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय निवडल्याचे प्राथमिक तपासात आढळले.
हॉटेलमध्ये गोपनीयता
हॉटेलमध्ये सहा महिन्यांच्या वास्तव्यात तिने हॉटेल स्टाफ किंवा हाऊसकीपिंगलाही आत येऊ दिले नव्हते. पोलिसांनी रुमची झडती घेतली तेव्हा मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता दिसून आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अफगाणी बॉयफ्रेंड, बड्या नेत्यांसोबत फोटो, ‘5 स्टार’मध्ये राहणाऱ्या महिलेचं पाक कनेक्शन, छ. संभाजीनगरात खळबळ
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? आज कोर्टात सुनावणीत काय घडलं?

View All
advertisement