आकाशवाणीकडून रिक्षातून क्र. एमएच 20 ईके 4557 सहा जण क्रांती चौकाकडे जात होते. मोंढा येथील उड्डाणपुलावरून जाताना पाठीमागून आलेली भरधाव कार (एमएच 20 जीक्यू 0221) त्या रिक्षावर आदळली. ही धडक एवढी जोरात होती की, रिक्षातून एक जण उड्डाणपुलावरून खालील रस्त्यावर सिंधी कॉलनीच्या बाजूने फेकला जाऊन जागीच गतप्राण झाला, तर एक 5 वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. मृतांची नावे अख्तर रजा (वय 22) व जाहरा (वय 5, रा. जुना बाजार) अशी आहेत.
advertisement
हिंजवडी हायड्रोपोनिक गांजा प्रकरणात धक्कादायक खुलासा, थेट संभाजीनगर कनेक्शन उघड
अपघातानंतर कार उलटून ती विरुद्ध दिशेला वळली. अपघातप्रसंगी झालेला मोठा आवाज ऐकून व कुणीतरी खाली पडल्याचे पाहून तेथील रिक्षाचालकांनी तिकडे धाव घेतली. जखमीला रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य काही चालकांनी उड्डाणपुलावर धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात नेले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जवाहरनगर पोलिसांनी धाव घेऊन उड्डाणपुलावरून एका बाजूची वाहतूक बंद केल्याचे पो. कॉ. रवींद्र शिंदे यांनी सांगितले. अपघातानंतर कारमधील तीन तरुण व तीन तरुणींनी कार सोडून पळ काढला. ही कार कुशलनगरमधील असल्याचे शिंदे यांनी सांगितले.






