छत्रपती संभाजीनगर : सध्याचे जग हे डिजिटल जग आहे आणि सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक होत चाललेल्या आहेत. आता अनेक जण स्कुटी तसेच कारही इलेक्ट्रीक वापरत आहेत. यामध्ये आता एसटी महामंडळाचाही समावेश झाला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन ई-बस शिवाय एसी बसही दाखल झाली आहे.
छत्रपती संभाजी नगर आगारातून दररोज आता पैठणसाठी नवीन ई-बस दाखल झालेली आहे. ही बस आता दररोज छत्रपती संभाजीनगर ते पैठण या मार्गावर दररोज धावणार आहे. विशेष म्हणजे ही बस इलेक्ट्रॉनिक असून पर्यावरणपूरक बस आहे. ही बस संपूर्ण एसी बस असणार आहे. तसेच या बसमध्ये सगळ्या सुविधा असणार आहेत. त्यामुळे आता दररोज छत्रपती संभाजीनगर ते पैठण प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी आनंददायी होणार आहे.
advertisement
Gila Vada Recipe : अमरावतीमधील स्पेशल 'गिला वडा' कसा फेमस झाला? त्याची रेसिपी काय?, VIDEO
ही शिवाई ई-बस दररोज आता छत्रपती संभाजीनगर ते पैठण अशा मार्गावर दररोज धावणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामधून ही बस सकाळी 6 वाजता, 7 वाजता, त्यानंतर साडेसात वाजता 8 वाजता, त्यानंतर साडेआठ वाजता आणि त्यानंतर साडेअकरा वाजता बसची वेळ असणार आहे. ज्या एसटी महामंडळाच्या सर्व सवलती आहेत, त्या या बसमध्येही लागू होणार आहेत. त्यामध्ये 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असणार आहे. त्यासोबत महिलांना अर्ध टिकीट असणार आहे, अशा सगळ्या सुविधा यामध्ये लागू होणार आहेत. या बसबाबत प्रवाशांनीही प्रतिक्रिया दिली.
नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO
या बसचे उद्घाटन माझ्या हातून झालेला आहे, याचा मला खूप आनंद होत आहे आणि खूप छान बस आहे. यामुळे आता पैठणला जायला काही त्रास होणार नाही आणि बस एसी असल्यामुळे पण खूप छान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. तसेच मी दररोज छत्रपती संभाजीनगर ते पैठणचा प्रवास करतो आणि ही जी बस नवीन इलेक्ट्रॉनिक सुरू झाली आहे, हे अत्यंत छान बस आहे आणि एसी बस असल्याने आता माझा प्रवास हा सोयीचा होईल आणि ही बस सुरू झाली आहे. याचा मला खूप अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.