वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी वाहनधारकांनी वरील पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिने भाविकांसाठी बंद, कारण काय? पाहा सविस्तर
बंद असणारा मार्ग
छत्रपती संभाजीनगर शहरातील मिलिंद चौक ते मकाई गेट हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील.
advertisement
पर्यायी मार्ग
नगरनाका/भावसिंगपुराकडून येणारी वाहने
नगर नाका किंवा भावसिंगपुराकडून मिलिंद चौकमार्गे बेगमपुरा, विद्यापीठ किंवा बीबी का मकबराकडे जाणारी वाहने आता मिलिंद चौक - बारापुल्ला गेट - मिलकॉर्नरमार्गे वळवण्यात आली आहेत.
बेगमपुरा/बीबी का मकबराकडून जाणारी वाहने
बेगमपुरा परिसरातून विद्यापीठ गेटमार्गे नगर नाका किंवा छावणीकडे जाणारी वाहने आता मकई गेट- टाऊन हॉल भडकल गेट-मिल कॉर्नर - बाबा पेट्रोल पंप या मार्गाने जाऊ शकतील.






