संभाजीनगर शहराला रोज 220 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सध्या केवळ 120 ते 125 एमएलडी पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. महापालेकेचे सगळे नियोजन बिघडले असून शहरात 8 ते 9 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात जलवाहिन्या फुटल्यामुळे 3 दिवस शहरांत पाणी आले नाही. तर काही भागात 10 ते 12 दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागली.
advertisement
पैशांचा पाऊस पडला पण..! डबल पैशांच्या नादात 12 लाखांना चुना, बीडच्या तिघांना कसं लुटलं?
आठवडाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत
शहराचा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून पूर्णपणे विस्कळीत आहे. फारोळा पंप हाऊस येथे बुधवारी रात्री 700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली होती. ती गुरुवारी सकाळी दुरुस्त झाली. परत 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला. तो जलवाहिनी बंद न करता दुरुस्तीचे प्रयत्न करून काम पूर्ण केले. पण या सगळ्यात शहरवासीयांचा पाणीप्रश्न कायम आहे.
किती दिवसांपासून शहरात पाणी नाही
विद्यानगर, पदमपुरा, शिवाजीनगर-रामकृष्णनगर या भागात आठ दिवसापासून पाणी येत नाही.
रेल्वेस्टेशन गोळेगावकर कॉलनी, भडकलगेट-टाऊन हॉल, एन-4, एन-11 रवींद्रनगर या ठिकाणी 9 दिवस झाले पाणी येत नाही.
समर्थनगर, गारखेडा नंदीग्राम कॉलनी, रवींद्रनगर-शिवशंकर कॉलनी, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, गणेश कॉलनी, एन-4 न्यायमंदिर रोड या भागात गेल्या दहा दिवसापासून पाणीबाणी आहे.
बसय्येनगर, जोहरीवाडा-रंगारगल्ली, भीमनगर-भावसिंगपुरा या भागात 11 दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही.
खिंवसरा पार्क, आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, हिलाल कॉलनी या भागात तर 12 दिवसांपासून पाणी आलेलं नाही.






