छत्रपती संभाजीनगर: सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी अगदी आनंदाने नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. नवीन वर्षाची सुरुवात अनेकजण देव दर्शनाने करतात. छत्रपती संभाजीनगरमधील खडकेश्वर मंदिरामध्ये अनेक तरुण दर्शनासाठी आले होते. या तरुणाईने नवीन वर्षात कोणते संकल्प केले आहेत? आणि त्यांनी देवाकडे नववर्षात काय मागितलंय? याबाबत जाणून घेऊया.
गरज असेल त्यांना दे
advertisement
देवाकडे स्वतःसाठी काहीच नाही मागितलेले. मला सर्व भेटले आहे. या नवीन वर्षामध्ये ज्यांना काही नाही भेटले त्यांना सर्व भेटू दे. सर्वांच्या इच्छा आकांक्षा या पूर्ण होऊ द्या, हीच देवाकडे मागणी केलेली आहे. गेल्यावर्षीचे माझ्याकडून करून राहायचं गेलं ते या वर्षात पूर्ण होते हा संकल्प मी केलेला आहे, असं तरुणी श्रेया हिनं सांगितलं.
जालन्यातून सात तासात मुंबईत, पाहा वंदे भारत ट्रेनची पहिली झलक, Video
आई-वडिलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
नवीन वर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने केली आहे. आज मी महादेवला अभिषेक केलेला आहे. मला अभिषेक करून खूप छान वाटत आहे. मी देवाकडे माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि माझ्या आई-वडिलांचे आरोग्यासाठी प्रार्थना केलेली आहे. हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाने जावो हीच देवा चरणी प्रार्थना, शहरातील तरुणी नयना हिनं केलीय.
नवं वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जावं
नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जावं. तसेच या वर्षांमध्ये तरुणांना देखील नोकरीच्या चांगल्या संधी भेटाव्यात. सरकारने थोडसं युवकांकडे लक्ष द्यावं आणि हे वर्ष सगळ्यांना चांगलं जावं ही प्रार्थना मी देवाकडे केलेली आहे, असं तरुण ज्ञानेश्वरनं सांगितलं.
संभाजीनगरची लेक 'वंदे भारत' चालवणार, कोण आहे कल्पना धनावत?
दुष्काळ पडू नये अशी प्रार्थना
येणारं वर्ष हे सर्वांसाठी आनंदाचे जावो. या वर्षामध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील हे वर्ष चांगलं जावं. शेतकऱ्यांना चांगलं पिके व दुष्काळ पडू नये हीच मी देवाकडे प्रार्थना केली आहे, असं सचिन याने सांगितलं.