Samruddhi Mahamarg : समृद्धीवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! महामार्गावर शेकडो खिळे ठोक्याने फुटले वाहनांचे टायर, पाहा Video

Last Updated:

Samruddhi Mahamarg Viral Video : समृद्धी महामार्गावर मोठी घटना समोर आली आहे. महामार्गावर शेकडो खिळे रोवल्याने अनेक वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडलीये.

Vehicle tires burst due to nail on Samruddhi
Vehicle tires burst due to nail on Samruddhi
Vehicle tires burst due to nail on Samruddhi : महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेल्या समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हादरवणारी घटना घडलीये. समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरकडून (Nagpur) मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्या. विशेष म्हणजे या गाड्या एकाच ठिकाणी पंक्चर झाल्याने संशय व्यक्त केला गेला. प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा, असं शक्यता होती. मात्र, सत्य बाहेर आल्यावर धक्काच बसला आहे.

बॅरिगेटिंग का केलं नाही?

समृद्धी महामार्गावर रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या प्रकारानंतर मग प्रश्न असा उपस्थित होतो की, रस्त्याचं काम सुरू होतं. तर बॅरिगेटिंग का केलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्रीतूनच हे खिळे कसे काय काढून टाकण्यात आले? असा सवाल देखील विचारला गेला आहे.
advertisement
advertisement

पुलावर मोठ-मोठे खिळे मारले

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ असलेल्या पुलावर मोठ-मोठे खिळे मारण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक वाहन पंचर झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली अनेक वाहनचालकांनी हा सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खिळे मारल्यावर या ठिकाणी महामार्ग प्रशासनाच्या वतीने कुठलेही बॅरिगेट लावण्यात आलेले नव्हते.
advertisement

जबाबदारी कुणाची होती?

दरम्यान, समृद्धीवर तब्बल 100 हून अधिक खिळे मारण्यात आले होते. त्यानंतर रात्री चार तास महामार्ग विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर महामार्ग बंद देखील करण्यात आला. मोठा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणाची होती? असा सवाल विचारला जात आहे. सुदैवाने फुल स्पीडमधून गाड्या जात असल्या तरी देखील कोणतीही दुर्घटना घडल्याचं समोर आलं नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Samruddhi Mahamarg : समृद्धीवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! महामार्गावर शेकडो खिळे ठोक्याने फुटले वाहनांचे टायर, पाहा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement