Priya Marathe: 'एवढ्या यातना...ती सुटली बरं झालं' प्रिया मराठेच्या निधनावर पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priya Marathe: अभिनेत्री शिवानी सोनार आज भावूक झाली. कारण, तिची जिवलग मैत्रीण आणि सहकारी प्रिया मराठे कायमची दूर गेली आहे. प्रियाच्या निधनावर आता शिवानी सोनार व्यक्त झाली आहे.
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांचं नातं केवळ कॅमेरासमोरचं नसतं, तर कॅमेराच्या मागेही अनेक क्षण एकमेकांसोबत घालवलेले असतात. अशाच आठवणींनी अभिनेत्री शिवानी सोनार आज भावूक झाली. कारण, तिची जिवलग मैत्रीण आणि सहकारी प्रिया मराठे कायमची दूर गेली आहे. प्रियाच्या निधनावर आता शिवानी सोनार व्यक्त झाली आहे.
प्रियाचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. कॅन्सरशी झुंज देत वयाच्या फक्त 38 व्या वर्षी ती जगाचा निरोप घेऊन गेली. या घटनेनं संपूर्ण मराठी-हिंदी मालिकांच्या जगतात शोककळा पसरली. पण, प्रियाच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट न लिहिल्यामुळे शिवानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर आता तिने मन मोकळं केलं. ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानी याविषयी व्यक्त झाली.
advertisement
शिवानी म्हणाली, “प्रियाचं जाणं मी मान्यच करू शकले नाही. तिचा फोटो शेअर करून काहीतरी लिहायचं मनात होतं, पण धाडस होत नव्हतं. दोन दिवस मी काहीच बोलू शकले नाही. आम्ही शेवटच्या मालिकेत एकत्र होतो. रोज मेकअप रूम शेअर केली होती. त्यामुळे तिचं जाणं स्वीकारणं फार कठीण आहे. काही माणसं कायम आपल्यासोबत राहतील असं वाटतं, प्रिया त्यापैकीच होती.”
advertisement
शिवानीने आणखी सांगितलं की शेवटच्या काळात प्रियाला खूप त्रास होत होता. “तिच्या वेदना पाहवत नव्हत्या. देवाने तिला त्या यातनांमधून मुक्त केलं, ते बरं झालं. प्रियाला एवढ्या यातना सहन कराव्या लागू नयेत, असं वाटत होतं. पण आज ती जिथे कुठे असेल, तिथे सुखी असेल. कधी कधी देव चांगल्या माणसांसोबत खूप वाईट गोष्टी करतो”.”
advertisement
प्रियाने ‘या सुखांनो या’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले आणि पुढे ‘चार दिवस सासूचे’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला. तिचं साधं-सरळ वागणं, हसतमुख स्वभाव आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची ताकद तिला वेगळी बनवत होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 1:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Marathe: 'एवढ्या यातना...ती सुटली बरं झालं' प्रिया मराठेच्या निधनावर पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री