ना मातीची गरज, ना प्रकाशाची... बंद AC खोलीत पिकवला जातो 'हा' गांजा; 1kg ची किंमत ऐकून व्हाल चकित!

Last Updated:

Satara Crime : राज्यात अमली पदार्थांची तस्करी वाढत असून, 'हायड्रोपोनिक' गांजाचा नवा आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. हा गांजा मातीविना, बंद आणि वातानुकूलित खोलीत...

Satara Crime
Satara Crime
Satara Crime : राज्यात अमली पदार्थांची तस्करी वाढत असून, आता 'हायड्रोपोनिक' गांजाचा नवा प्रकार समोर आला आहे. पुण्यात पोलिसांनी तब्बल 10 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यालाही या धोक्यापासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
'हायड्रोपोनिक' गांजा म्हणजे काय?
'हायड्रोपोनिक' गांजा म्हणजे मातीचा वापर न करता, बंद आणि वातानुकूलित खोलीत उगवलेला गांजा. 'कोकोपिट' (नारळाच्या शेंड्याचा चुरा) किंवा पाण्यात पोषक द्रव्ये मिसळून याची लागवड केली जाते. यामुळे कमी वेळेत अधिक उत्पादन मिळते आणि हा गांजा सामान्य गांजापेक्षा अधिक प्रभावी असतो. त्याची नशा तीव्र असल्याने त्याला जास्त मागणी असते. मुंबईत जप्त झालेल्या एका किलो हायड्रोपोनिक गांजाची किंमत एक कोटी रुपये होती.
advertisement
परदेशातून तस्करीचा धोका
या गांजाची तस्करी प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि थायलंड यांसारख्या देशांतून होते. दोन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. महाराष्ट्रातील एक तरुण ऑस्ट्रेलियातून भारतात गांजा पाठवत असताना त्यालाही अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर म्हणाले की, "नशामुक्त सातारा जिल्हा मोहिमेअंतर्गत दीड वर्षांत सुमारे दीडशे किलो गांजा जप्त करून कारवाई केली आहे. आपल्या जिल्ह्यात अजूनपर्यंत हायड्रोपोनिक गांजा सापडलेला नाही, तरीही आम्ही खबरदारी घेत आहोत."
advertisement
दोषींवर कठोर कारवाई
अमली पदार्थ कायद्यानुसार, कमी प्रमाणात अमली पदार्थ सापडल्यास 1 वर्षाची कैद आणि 10 हजार रुपये दंड असतो. मोठ्या प्रमाणात आढळल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि विक्रीच्या उद्देशाने बाळगल्यास 10 ते 20 वर्षांचा कारावास आणि 1 ते 2 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
ना मातीची गरज, ना प्रकाशाची... बंद AC खोलीत पिकवला जातो 'हा' गांजा; 1kg ची किंमत ऐकून व्हाल चकित!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement