समाजकल्याण विभागातील निरीक्षक पदासाठी मंगळवारी ऑनलाईन परीक्षा झाली. 18 मार्च रोजी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयऑन डिजिटल केंद्रात ही परीक्षा पार पडली. यावेळी अक्षय चव्हाण हा चलाखीने मोबाईल घेऊन आत गेला होता. अक्षयने सीपीयू मागे मोबाईल लपविला. एका उमेदवाराने लघुशंकेला जाण्याचे नाटक करीत ही बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पडताळणी केल्यानंतर मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अक्षय चव्हाणला ताब्यात घेऊन एमआयडीसी सिडको पोलिसांकडे धाव घेतली.
advertisement
प्रियकराचा मोबाईल ढापला अन् उघड झालं मोठं कांड, समलैंगिक प्रेमाचा करुण अंत..
नेमकं काय घडलं?
एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. परीक्षा केंद्रात मनाई असताना त्याने मोबाईल नेला. उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नोटीस देऊन सोडून देण्यात आले. जर तुम्हाला शासकीय नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. त्यासाठी चुकीचा मार्ग निवडणं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही मन लावून आणि मेहनत घेऊन पेपर सोडवणं गरजेचं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.