प्रियकराचा मोबाईल ढापला अन् उघड झालं मोठं कांड, समलैंगिक प्रेमाचा करुण अंत..

Last Updated:

Mumbai Crime: मुंबईत व्हॅलेंटाईन डेला झालेल्या एका मृत्यूचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. समलैंगिक संबंधातून हा प्रकार झाल्याचं उघड झालंय.

प्रियकराचा मोबाईल ढापला अन् उघड झालं मोठं कांड, समलैंगिक प्रेमाचा करुण अंत..
प्रियकराचा मोबाईल ढापला अन् उघड झालं मोठं कांड, समलैंगिक प्रेमाचा करुण अंत..
मुंबई : मायानगरी मुंबईत 34 वर्षीय तरुण आणि 55 वर्षीय व्यक्तीची गाढ मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढं प्रेमात झालं. परंतु, प्रेमाचा दिवस मानल्या जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’लाच या प्रेमसंबंधांचा करुण अंत झाला. समलैंगिक संबंधांवेळी 55 वर्षीय व्यक्तीचा बेशुद्ध होऊन मृत्यू झाला. तर पार्टनर 34 वर्षीय तरुण मोबाईल घेऊन पसार झाला. मात्र, याच मोबाईल चोरीच्या प्रकारामुळं मोठं कांड उघड झालं असून पोलीस तपासात समलैंगिक संबंधांना देखील वाचा फुटलीये.
नेमकं घडलं काय?
समलैंगिक संबंधातून पार्टनरचा अंत झाल्याची घटना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मुंबईमध्ये झाली होती. या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आला आहे. 34 वर्षीय तरुण आणि 55 वर्षीय व्यक्तीचे मागील अनेक वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना 55 वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडून मृत झाला. यामुळे घाबरलेल्या 34 वर्षीय पार्टनरने 55 वर्षीय पार्टनरच्या खिशातील दोन मोबाईल फोन घेऊन पसार झाला. या चोरलेल्या मोबाईल फोनमुळेच या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेय.
advertisement
12 वर्षांचे प्रेमसंबंध
काळबादेवी परिसरात राहणारा मृत 55 वर्षीय व्यक्ती हा अविवाहित होता. त्याच्या मालकीची दोन्ही घरे भाड्चाने देत त्यातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह व्हायचा. याच परिसरात कपडांच्या दुकानात काम करणाऱ्या 34 वर्षीय तरुणासोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे भेटीगाठी वाढत गेल्या. 12 वर्षापासून ते प्रेमसंबंधात होते. तर 34 वर्षीय तरुणाचे लग्न झाले असून त्याला मुलगा आहे.
advertisement
सेलिब्रेशननं झाला अंत
'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने दोघांनीही काळबादेवीतील घरात सेलिब्रेशन केले. सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये समलैंगिक संबंध सुरु असताना 55 वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडला. त्याला कुठलीही वैद्यकीय मदत न करता जोडीदार पसार झाला. अखेर दोन दिवसाने त्याच इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांना त्यांचा दरवाजा उघडा दिसला. आतून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी आतमध्ये डोकावले तेव्हा 55 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत दिसली. घटनेची माहिती मिळताच एलटी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
advertisement
मोबाईल चोरीने उघड झालं कांड
34 वर्षीय तरुणाने आपल्या पार्टनरला मोबाईल ठेवायला दिला होता. मात्र तो त्याच्या पार्टनरकडून गहाळ झाला. यावरून दोघांमध्ये वाद देखील झाले. पार्टनरने त्या बदल्यात पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र त्याला मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे घटनेच्या दिवशी पार्टनरच्या अंगावर चादर टाकून दोन मोबाईल घेऊन गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. याच मोबाइलच्या आधारे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. मोबाईल चोरीने या गुन्ह्याचा उलगडा झाला आणि समलैंगिक संबंधांला वाचा फुटली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
प्रियकराचा मोबाईल ढापला अन् उघड झालं मोठं कांड, समलैंगिक प्रेमाचा करुण अंत..
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement