शहरातील पहाडसिंगपुरा येथील हनुमान टेकडी परिसरात रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा जारला 40 रुपये मोजावे लागतात. तसेच या ठिकाणी सरकारी नळ कनेक्शन देखील नाही. त्यामुळे खाजगी टँकर धारकांना देखील पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागते. येथील रहिवाशी पाण्याअभावी त्रासून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, प्रत्येक घराला महिन्यातून दोन ते तीन पाणी टँकर लागते. एक टँकर 1700 रुपयांना मिळतो. तर दर महिन्याला सुमारे पाण्यासाठी पाच हजार रुपये खर्च करावा लागत असल्याचे हनुमान टेकडी येथील रहिवाशी सुनीता बैरागी यांनी लोकल18 सोबत बोलतांना सांगितले.
advertisement
Water : आरओ किंवा जारचे पाणी पिताय? लगेच बदला सवय, नाहीतर गंभीर आजाराला जावे लागेल समोर
सरकारने आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बैरागी यांनी सरकारकडे केली आहे. तर मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने अडचणीचे होते. पाणी विकत घ्यावे लागते आणि सध्या देखील अशीच पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरनेच पाणी पुरवठा होत असल्याचे शेंद्रा गावातील भाऊलाल कस्तुरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस पडतोय. तरीही ग्रामीण भागासह शहरातील पाणी टंचाईची समस्या कायम आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गावाच्या लोकसंख्येनुसार ज्या गावात लोकसंख्या जास्त असेल तिथे दोन पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. तर काही ठिकाणच्या गावची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना 1 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे टँकर चालक गणेश घुले यांनी सांगितले.





