आपल्या सर्वांना ही विनंती करायची आहे ही दिवाळी आरोग्यदायी कशी राहील या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी सतर्क राहून दिवाळी साजरी करावी. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत अनुदान आणि निधी वाटपाचे काम सुरू आहे. या सर्व शेतकरी बांधवांसोबत आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे त्यांच्या या संकटामध्ये त्यांच्यासोबत आपण राहूया त्यांना सोबत घेऊन आपण दिवाळी साजरी करूया, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले.
advertisement
आपण सर्वांनी या दिवाळीमध्ये खाण्याचे पदार्थ खरेदी करत असताना काळजी घ्या. फटाके आणि ज्वलंत वस्तू आपण आनंदाच्या भरात उडवायला जातो तेव्हा अपघात होतात. अशा पद्धतीचे अपघात होणार नाहीत लहान बाळांना मुलांना विशेष काळजी आपण घ्यावी.
ग्रामीण भागामध्ये आपण सर्व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही दिवाळी आरोग्यदायी होईल यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहावे. अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि आपल्याकडून होईल तेवढी मदत आपण शेतकऱ्यांना करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.