छत्रपती संभाजीनगर : आपल्या सर्वांना अस वाटते की, आपण फक्त प्रजासात्ताक दिनाला किंवा स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करतो. मात्र, एक ठिकाण असे आहे, ज्याठिकाणी दररोज ध्वजारोहण केलं जातं. आता तुमच्या मनातही उत्सुकता असेल की कोणतं ठिकाण आहे. चला तर मग ते आपण आज जाणून घेऊयात.
शासकिय कार्यालयात दररोज ध्वजारोहण केले जाते. याविषयी फार कमी लोकांना माहिती असते. याठिकाणी रोज नियमित म्हणजे वर्षाचे 365 दिवस याठिकाणी रोज ध्वजारोहण केले जाते. ऊन असो वारा असो की पाऊस असो तरीसुद्धा नियमानुसार याठिकाणी ध्वजारोहण केले जाते.
advertisement
शासकिय कार्यालयांत जे ध्वजारोहण करतात, ते कुणी शासकीय अधिकरी किंवा कुणी क्लास वन अधिकारी नसतात. तर हे काम या ठिकाणी जे कर्मचारी असतात ते हे ध्वजारोहण करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 12, 13 वर्षापासून उत्तम राम कुंभार आणि मुजीब खान पठाण आणि सय्यद अझरुद्दीन आणि प्रवीण नरवाडे हे चार कर्मचारी हे ध्वजारोहणाचं कार्य पार पाडत आहेत.
या चार कर्मचाऱ्यांची 15 दिवसाची शिफ्ट असते. ते त्यांना ज्याप्रमाणे सांगितलं जातं, त्यानुसार काम करत असतात. सकाळ झाली की आधी दिलेल्या वेळेत आधी ध्वजारोहण केले जाते. यानंतर सायंकाळी सूर्यास्ताच्या आधी ध्वज हा खाली उतरवतात. याबाबत लोकल18 च्या टीमने या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
काय म्हणाले कर्मचारी -
मी केल्या 10-12 वर्षांपासून हे काम करत आहे. हे काम मला करायला मिळाले याचा मला खूप अभिमान आहे. रोज सकाळी ध्वजारोहण होते. मी सायंकाळी तो उतरतो. मला माझ्या निवृत्तीपर्यंत हे काम करायला मिळाले तर मी खूप जास्त आनंदी राहील, असे उत्तम राम कुंभार हे कर्मचारी म्हणाले.
तसेच मी सुद्धा 8-9 वर्षांपासून हे काम करत आहे. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे काम सामान्य लोकांना करायला मिळत नाही. ते आम्हाला करायला भेटत आहे. यामुळे मला खूप छान वाटते, असे लाल खान पठाण हे कर्मचारी म्हणाले.
यासोबतच मीसुद्धा मागील 12-13 वर्षापासून हे काम करत आहे. आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना आहे काम करायला मिळत आहे. रोज ध्वजारोहण करने आणि ध्वज खाली उतरवणे हे एक खूप काम करायला मिळणे ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, असे सय्यद असुद्दिन हे कर्मचारी म्हणाले.
तर हे काम करुन छान वाटते. आम्ही क्लास फोर कर्मचारी लोक आहोत आणि आम्हाला रोज हे ध्वजारोहण करायला मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रवीण नरवाडे हे कर्मचारी म्हणाले.