छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीतील संतोषीमाता नगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. प्रकाशसिंह भिकूसिंह ताटू असे 60 वर्षीय मृत वडिलांचे नाव आहे. ताटू यांची मुलगी दीपाली हिचा मंगळवारी विवाह झाला. ज्या घरातून दीपाली बोहल्यावर चढली तिथेच दुसऱ्या दिवशी वडिलांची अंत्ययात्रा निघाली. तेव्हा दारातील मंडप देखील तसाच होता.
मापात पाप केलं म्हणून कोर्टात नेलं, चहावरुन थेट कॅन्टीनवर खटला
advertisement
लाडक्या लेकीच्या लग्नात नाचले
लग्नासाठी पाहुणे, मित्र, आप्तेष्ट लग्नघरी आदल्या दिवशीच दाखल झाले होते. दारात मांडव टाकला होता. मुलीला हळद लागली अन् मंगळवारी सायंकाळी लग्नही लागलं. दीपाली ही प्रकाशसिंह याची लाडकी लेक असल्याचं जवळचे सांगतात. त्यामुळे मुलीच्या हळदीत आण लग्नात ते खूप नाचले. बुधवारी पहाटे 4 वाजता मुलीची पाठवणी झाली. त्यानंतर प्रकाशसिंह हे घराच्या गच्चीवर जाऊन झोपले. मात्र, ते पुन्हा उठलेच नाहीत. हृदविकाराच्या झटक्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
भाऊ आणायला गेला अन्..
प्रकाशसिंह यांना 5 मुली आणि 1 मुलगा आहे. दीपाली ही चौथ्या क्रमांकाची मुलगी आहे. लग्न लागल्यानंतर दीपाली सासरी गेली आणि भाऊ तिला परत आणायला गेला होता. त्याचवेळी ही बातमी समजली. लग्नघरातील आनंदाचे वातावरण काही तासातच दु:खाद बदलले. बहिणीला काहीही कळू न देता तो तिला घेऊन घरी परतला. परंतु, घरी आल्यावर वडिलांचा मृतदेह पाहून लेकीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून सर्वजण हळहळले.






