इंडिगो विमानसेवा: जुने आणि नवीन वेळापत्रक
मुंबईसाठी सकाळी
टेक ऑफ हे मुंबईवरून होईल. पूर्वी सकाळी 5.25 होते आणि आताही सकाळी 6.10 मिनिटांनी असेल. लँडिंग हे संभाजीनगर या ठिकाणी सकाळी 6.30 पूर्वी होते आणि आता 7.20 होणार आहे. संभाजीनगरवरून टेक ऑफ हे सकाळी 7 वाजता होते पूर्वी. आणि आता नवीन वेळेमध्ये 6.50 होणार आहे. मुंबईला लँडिंग हे पूर्वी 8 वाजता होते आणि आता लँडिंग हे 8.50 होणार आहे.
advertisement
मुंबईसाठी संध्याकाळी
मुंबईवरून टेक ऑफ हे पूर्वी संध्याकाळी 7.20 मिनिटांनी होते आणि आता ते 7.35 होणार आहे. संभाजीनगर या ठिकाणी लँडिंग हे पूर्वी 8.25 होते आता हे 8.45 होईल. संभाजीनगरवरून टेक ऑफ हे पूर्वी 8.55 होते आता हे 9.15 होईल. मुंबई या ठिकाणी लँडिंग हे पूर्वी 9.55 होते आता हे 10.15 होईल.
हैदराबादसाठी सकाळी
हैदराबादवरून सकाळी टेक ऑफ हे पूर्वी 6.30 होते आता हे 6.40 होईल. संभाजीनगर येथे लँडिंग हे पूर्वी 7.50 होते आता हे 8.10 होईल. संभाजीनगरहून टेक ऑफ हे पूर्वी सकाळी 8.10 होते आता हे 8.30 मिनिटांनी असेल. हैदराबाद या ठिकाणी लँडिंग हे पूर्वी 9.40 होते आता ते 9.55 मिनिटांनी असेल.
हैदराबादसाठी दुसरे विमान हे हैदराबादवरून पूर्वी दुपारी 4.5 मिनिटांनी टेकऑफ करत होते. पण आता ते 10.55 मिनिटांनी असेल. आणि संभाजीनगर या ठिकाणी लँडिंग ही पूर्वी दुपारी 5.35 मिनिटांनी होते आणि आता हे 12.25 मिनिटांनी असेल. संभाजीनगरवरून हे विमान पूर्वी संध्याकाळी 5.55 मिनिटांनी टेकऑफ घ्यायचे आता ते 12.55 मिनिटांनी टेकऑफ घेईल. आणि हैदराबाद या ठिकाणी पूर्वी लँडिंग हे संध्याकाळी 7.35 मिनिटांनी होते आणि आता ते दुपारी 2.20 मिनिटांनी होईल. हे जे विमान आहे ते आठवड्यातून तीन वेळा असेल सोमवार, बुधवार आणि शुक्रवार.
बेंगळुरुसाठी विमानसेवा
बेंगळुरुसाठी विमानसेवा ही आठवड्यातून तीन वेळा असते. यामध्ये मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. बेंगळुरुवरून हे विमान पूर्वी दुपारी 2.25 मिनिटांनी होते आता ते सकाळी 6.55 मिनिटांनी असणार आहे. आणि संभाजीनगर या ठिकाणी लँडिंग हे पूर्वी दुपारी 4.05 होते आणि आता ते सकाळी 8.30 असणार आहे. संभाजीनगरवरून टेकऑफ हे विमान पूर्वी दुपारी 4.36 मिनिटांनी होते आणि आता ते सकाळी 9 वाजता असणार आहे. बेंगळुरु या ठिकाणी या विमानाचे लँडिंग हे पूर्वी 6.15 मिनिटांनी होते आणि आता ते सकाळी 10.30 असणार आहे.
नवी दिल्लीसाठी विमानसेवा
नवी दिल्ली येथून टेक ऑफ हे पूर्वी सायंकाळी 5.05 मिनिटांनी होते आणि आता ते दुपारी 4.55 मिनिटांनी असणार आहे. संभाजीनगर या ठिकाणी लँडिंग हे पूर्वी सायंकाळी 6.55 मिनिटांनी होते आणि आता हे संध्याकाळी 6.45 मिनिटांनी असणार आहे. संभाजीनगर या ठिकाणाहून टेक ऑफ हे संध्याकाळी 7.25 मिनिटांनी होते आणि आता हे 7.15 मिनिटांनी असणार आहे आणि दिल्ली या ठिकाणी हे लँडिंग पूर्वी रात्री 9.30 होते आणि आता हे रात्री 9.05 मिनिटांनी असणार आहे.
गोव्यासाठी तीनवेळा विमान
गोवा या ठिकाणी आठवड्यातून तीन वेळा विमान असेल मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. गोवा वरून टेक ऑफ हे पूर्वी दुपारी 12.55 मिनिटांनी होते. आणि आता हे दुपारी 2.05 मिनिटांनी असणार आहे. संभाजीनगर येथे लँडिंग हे पूर्वी दुपारी 3.10 मिनिटांनी होते आणि आता ते 4.00 वाजता असणार आहे. संभाजीनगरवरून टेक ऑफ हे पूर्वी दुपारी 3.15 मिनिटांनी होते आणि आता ते 4.45 वाजता असणार आहे. पूर्वी हे लँडिंग हे संध्याकाळी 5.50 मिनिटांनी होते आणि आता हे 6.35 होणार आहे.
मुंबईची वेळ बदलली
मागील वेळापत्रकाच्या तुलनेत मुंबईचे सकाळचे विमान 50 मिनिटे उशिराने चिकलठाणा विमानतळावरून निघणार आहे.
एअर इंडियाची एक सेवा वाढली
एअर इंडियाच्या दिल्ली सेवेत बदल झाला आहे. आता दिल्ली येथून सकाळी 6 वा. विमान उड्डाण घेऊन संभाजीनगरला सकाळी 8 वा. लँड होईल. परतीसाठी सकाळी 8.40 वा. निघून सकाळी 10.35 दिल्ली येथे पोहोचेल. दुपारच्या सत्रात दिल्ली येथून दुपारी 2 वा. निघून दुपारी 3.50 वा. संभाजीनगरला पोहोचणार आहे.






