11 हजार रुद्राक्षांचा श्रीगणेश
माहेश्वरी गणेश मंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करते. यंदा या मंडळाने तब्बल 11000 रुद्राक्षांचा वापर करून गणपती बाप्पाची आठ फूट उंचीची मूर्ती केलेली आहे. त्यांनी सर्व ठिकाणावरून रुद्राक्ष गोळा करून प्रत्येक ज्योतिर्लिंगाला हे रुद्राक्ष पाठवले. त्यानंतर हे सर्व रुद्राक्ष त्यांनी औंढा नागनाथ येथे पाठवून हिंगोलीच्या मूर्तिकाराकडून ही गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती तयार केलेली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी हा लागला.
advertisement
दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज; संभाजीनगरमध्ये असा होतो गणेशोत्सव साजरा...
अष्टविनायकाचा देखावा
गणेश मंडळाने सुंदर असा अष्टविनायकाचा देखावा देखील केलेला आहे. सर्व नागरिकांना या दहा दिवसांमध्ये अष्टविनायकाचे दर्शन घेता यावा अशा हेतूने त्यांनी हा देखावा केलेला आहे. मूर्ती विसर्जन केल्यानंतर हे मंडळ सर्व रुद्राक्ष हे भाविकांमध्ये वाटप करून टाकणार आहेत. हे रुद्राक्ष घेण्यासाठी भाविकांनी संभाजीनगर येथील खडकेश्वर मंदिरामध्ये येऊन नोंदणी करावी किंवा गुगल फॉर्म वरती सुद्धा नाव नोंदणी करू शकता. रुद्राक्ष घेण्यासाठी https://forms.gle/yHLJUSe9FMgkXBAc8या लिंक वरून तुम्ही नोंदणी करू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.
दोन गावात एकच गणपती! महाराष्ट्रातील ‘या’ गावांनी घालून दिला आदर्श Video
देखावा पाहण्याचे आवाहन
गणरायाच्या मूर्तीसाठी आम्ही विविध ठिकाणांहून रुद्राक्ष गोळा केले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अष्टविनायकाचे दर्शन करता यावे यासाठी आम्ही अष्टविनायकाचा देखावा देखील केलेला आहे. यामुळे सर्व भक्तांना शहरामधूनच अष्टविनायकाचे दर्शन घेता येईल. आम्ही रुद्राक्षाची सुंदर अशी बाप्पाची मूर्ती केलेली आहे. तरी मी आमच्या मंडळाच्या वतीने सर्वांना विनंती करतो की सर्वांनी येथील सुंदर देखावा बघावा, असे मंडळाचे सचिव कैलाश मुंदडा यांनी सांगितले.