छत्रपती संभाजीनगर शहरांमधील रोपळेकर चौकाजवळ गुरुकुंज हाऊसिंग सोसायटी आहे या ठिकाणी हे भारत मातेचे मंदिर आहे. 1997 साली हे मंदिर बांधण्यासाठी ठरवले आणि 1999 साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. हे मंदिर बांधण्याचं मूळ उद्दिष्ट असे होते की इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिलेले आहे आणि हीच माहिती येणाऱ्या पुढच्या पिढीला माहिती व्हावी यासाठी हे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
advertisement
Independence: स्वातंत्र्य लढ्याचे ऐतिहासिक साक्षीदार, मुंबईतील 5 ठिकाणं तुम्हाला माहितीये का?
याला सगळ्यांच्या वतीने परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये देशातील निवडक शंभर अशा क्रांतिकारकांची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी मोठी भारत मातेची अशी मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे.
सर्व क्रांतिकारकांची माहिती यामध्ये आहे आणि यामध्ये त्यांना कुठे फाशी देण्यात आली किंवा त्यांचे एकंदरीत कार्य काय होते हे सर्व या मंदिरात दाखवण्यात आलेले आहे. हे मंदिर सकाळी नऊ वाजता उघडते ते रात्री सात वाजेपर्यंत हे मंदिर सर्वांसाठी खुले असते. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क हे आकारण्यात येत नाही.
हे मंदिर बांधण्याचा मूळ उद्देश असा होता की येणाऱ्या पिढीला सर्व माहिती झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही हे मंदिर बांधलेले आहे. ज्याला मंदिर हे नाव हे याकरिता दिले आहे की ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे ते आपल्या कायम स्मरणात राहावे आणि जागा पवित्र राहावी यासाठी याला आम्ही मंदिर नाव दिले आहे, असे माजी उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले.