छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी हा आंबा महोत्सव होत आहे. 27 मे पर्यंत हा आंबा महोत्सव असणार असून थेट शेतकरी ते ग्राहक आंबे मिळणार आहेत.
एकीकडे धो धो पाऊस, पण छ. संभाजीनगरच्या 65 गावांवर जलसंकट, पिण्यासाठीही नाही पाणी!
advertisement
या आंबा महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आंबा उत्पादक आलेले आहेत. या ठिकाणी पाच ते सहा प्रकारचे आंबे विक्रीसाठी आहे. केसर, हापूस हे आंबे विक्रीसाठी आलेले आहेत. 100 रुपये किलो पासून आंब्याचे भाव आहेत. केसर 100 रुपये किलो, हापूस एक हजारांत तीन डझन, तर काही आंबे 400 ते 600 रुपये डझनपर्यंत मिळतात. विशेष म्हणजे हे ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही.
या ठिकाणी थेट शेतकरी ते ग्राहक असे आंबे मिळणार आहेत. तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा भेटेल. या आंबा महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथले आंबे हे ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आंबे खरेदी करा. तुम्हाला आंबे नक्कीच आवडतील, असे आवाहन विक्रेते संदीप माने यांनी केले.





