TRENDING:

turmeric powder benefits : हळद आहे खूपच गुणकारी! आहेत भन्नाट फायदे, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...

Last Updated:

नेमके हळदीचे आपल्या शरीराला कसे कसे फायदे होतात किंवा आपण कोणकोणत्या माध्यमातून हळदी घेऊ शकतो, याविषयी आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : आपल्या स्वयंपाक घरामध्ये हळद हा एक महत्त्वाचा घटक असतो. हळद हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हळद आपण दररोजच्या स्वयंपाका मध्ये वापरतो. मात्र, यासोबतच आयुर्वेदामध्येही हळदीचे खूप फायदे आहेत. नेमके हळदीचे आपल्या शरीराला कसे कसे फायदे होतात किंवा आपण कोणकोणत्या माध्यमातून हळदी घेऊ शकतो, याविषयी आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

लोकल18 च्या टीमशी बोलताना त्यांनी सांगितले की, हळदीचे आपल्या शरीराला खूप असे फायदे होतात. सध्या बाजारात ओली हळदही आलेली आहे. ज्यांना मधुमेह आहे, अशा सर्वांना ओली हळदी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला हातापायांना मुंग्या येत असतील तर ओली हळद फायदेशीर ठरते. ही ओली हळद तुम्ही हळदीचे साल काढून घ्यावी, त्यानंतर तिचे बारीक बारीक काप करून घ्यावेत. यानंतर त्यावर लिंबू पिळावा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावर तुम्ही सैंधव मीठ टाकून तुम्ही जेवण झाल्यानंतर त्याचे दोन कप खावेत. यामुळे तुम्हाला भरपूर फायदे होतात. हे जे केलेले काप आहेत, ते शरीरातील वाढलेली साखर कमी करायला मदत करतात.

advertisement

याठिकाणी मिळतात अतिशय सुंदर हँडक्राफ्ट वस्तू, खार रोडवर आहे एक खास दुकान, VIDEO

तुम्हाला लठ्ठपणा असेल किंवा मधुमेह असेल किंवा हृदयरोग असेल तर ही ओली हळद तुम्हाला भरपूर प्रमाणात मदत करते. त्यासोबतच जी हळदीची पावडर असते, तीदेखील भरपूर प्रमाणात मदत करते. ही हळदीची पावडर तुम्ही दुधात टाकून घेतली तरीही त्याचा भरपूर तुम्हाला फायदा होतो. विविध आजारांवर हळदी अत्यंत गुणकारी ठरते. तुम्ही ओली हळद घेऊ शकतात किंवा हळदीची पावडरही तुम्ही विविध माध्यमातून घेऊ शकता.

advertisement

बटाट्याचा पराठा हा मनु भाकरचा आवडीचा पदार्थ, सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO

तर अशाप्रकारे आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा माध्यमातून हळदीचे सेवन केले तर तुम्हाला भरपूर असे फायदे होतात. तसेच त्यासोबत तुमचे शरीर निरोगी राहण्यासाठीही मदत होते.

सूचना : ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
turmeric powder benefits : हळद आहे खूपच गुणकारी! आहेत भन्नाट फायदे, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल