छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ॲम्बुलन्स हेल्प रायडर हा एक ग्रुप आहे. या ग्रुप अंतर्गत त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. तो उपक्रम म्हणजे दर्शनदूत. हा उपक्रम त्यांनी चार वर्षांपासून सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील जे वृद्ध आहेत किंवा जे अपंग आहेत अशा सर्वांना देवीचे दर्शन घेण्यासाठी ते मदत करत असतात. त्यांच्या घरापासून घेऊन मंदिरापर्यंत दर्शन करून आणतात आणि त्यानंतर त्यांना परत त्यांच्या घरी नेऊन सोडण्याचे काम करतात. या 4 वर्षांमध्ये 1700 पेक्षा जास्त वयोवृद्धांना आणि अपंगांना दर्शन घडवून आणलेले आहे.
advertisement
Tuljabhavani: पुण्यात तुळजाभवानीची स्वयंभू मूर्ती, बोललेला नवस पूर्ण होतोचं, काय आहे आख्यायिका?
मंदिरामध्ये त्यांचे सर्व स्वयंसेवक असतात, ते सर्व वयोवृद्धांना देवीचे दर्शन घडवून आणतात, त्यांना सर्व मदत करत असतात. अशा पद्धतीने हे गेल्या 4 वर्षांपासून काम करतात. यासाठी आधी नावनोंदणी करावी लागते आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घरून घेऊन मंदिरात दर्शन करायला घेऊन जात असतात. त्यासोबतच दर्शन झाल्यानंतर ते सर्वांना एक कर्णपुरा मातेचा फोटो देखील देतात. तर अशा पद्धतीने त्यांचे हे सर्व काम चालते.