प्रकरणात 23 वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या दिव्याने तक्रार दिली आहे. तिने सांगितले की, काही वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात तिची आणि मनोहरची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. दोघांमध्ये सातत्याने फोनवरून बोलणे सुरू झाले. मनोहरने लग्नाचं आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला आणि 2022 ते जून 2025 दरम्यान विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. मात्र जुलैनंतर त्याने अचानक लग्न करण्यास नकार दिला.
advertisement
'पैसे घे अन् माझ्यासोबत चल', संभाजीनगरमध्ये भरचौकात तरुणीला विकृताची ऑफर, अश्लील हावभाव...
दिव्याने वारंवार त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने केवळ नकारच दिला नाही, तर तिच्या आणि तिच्या वडिलांना धमक्या दिल्या. इतकंच नव्हे, एकदा तर त्याने तिच्या वडिलांनाही हायवेमध्ये गाडीखाली उडवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती इतकी गंभीर बनली की, दिव्याला स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली. त्यातच मनोहरच्या काही नातेवाईकांनीही तिला मारहाण केली.
मनाने खचलेली पण धैर्य न हरवलेली दिव्या अखेर न्यायासाठी पुढे आली. तिच्या तक्रारीनंतर क्रांती चौक ठाण्याच्या पोलिसांनी मनोहर लिंबाजी चव्हाण याला अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. जांबोटकर यांनी त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
2023 मध्ये दिव्या मनोहरच्या घरी गेली असता, त्याच्या नातेवाईकांनी तिच्यावर हल्ला केला होता. त्या वेळी ‘लग्न करीन’ या आश्वासनावर प्रकरण मिटवलं गेलं, पण पुन्हा विश्वासघात झाल्यावर दिव्याने गप्प न राहता थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दिव्याची ही वेदनादायी कहाणी अनेक मुलींना विचार करायला लावणारी आहे. एका लग्नात झालेली ओळख तिच्यासाठी आयुष्यभराचं दुःख ठरली. प्रेमाच्या नावाखाली भावनांशी खेळ करणाऱ्यांनी आता यावरून शिकावं, कारण प्रत्येक ‘दिव्या’ आता गप्प राहणार नाही, ती न्यायासाठी आवाज उठवणार आहे.






