पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी तुषार वर्मा हा अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खडकी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचे साथीदार सुमीत डेडवाल आणि अक्षय महेर हे पिंपरी-चिंचवड भागात राहत असल्याचे समोर आले.
advertisement
सखोल तपासात या आरोपींनी हिंजवडीतील एका सदनिकेत भाड्याने वास्तव्य करून तेथे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी दोन युवक हे गंगापूर तालुका येथील असल्याचे समोर आल्याने स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गंगापूरमधील सुमीत संतोष डेडवाल आणि अक्षय सुखलाल महेर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उच्च शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक सुबत्तेचा आडोसा घेत अमली पदार्थांचा काळा धंदा चालवला जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात चिंता आणि संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.






