इमरान शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. बुधवारी रात्री उशिरा तो संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली आला असता चारचाकीमधून आलेल्या दोन जणांनी त्याला गाठलं आणि धारदार कोयत्याने त्याच्यावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, इमरान जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात उड्डाण पुलाखाली घडली. इमरान शेख (Imran Shaikh) असे हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. बुधवारी रात्री उशिरा कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इमरानवर कोयत्याने सपासप वार केले. हल्लेखोरांनी अचानक केलेल्या या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
हल्ला केल्यानंतर आरोपी हल्लेखोर लगेचच त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली आणि पंचनामा केला. पुढील तपासणीसाठी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आला. हत्या करण्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.