बॅरिगेटिंग का केलं नाही?
समृद्धी महामार्गावर रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या प्रकारानंतर मग प्रश्न असा उपस्थित होतो की, रस्त्याचं काम सुरू होतं. तर बॅरिगेटिंग का केलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्रीतूनच हे खिळे कसे काय काढून टाकण्यात आले? असा सवाल देखील विचारला गेला आहे.
advertisement
पुलावर मोठ-मोठे खिळे मारले
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ असलेल्या पुलावर मोठ-मोठे खिळे मारण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक वाहन पंचर झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली अनेक वाहनचालकांनी हा सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खिळे मारल्यावर या ठिकाणी महामार्ग प्रशासनाच्या वतीने कुठलेही बॅरिगेट लावण्यात आलेले नव्हते.
जबाबदारी कुणाची होती?
दरम्यान, समृद्धीवर तब्बल 100 हून अधिक खिळे मारण्यात आले होते. त्यानंतर रात्री चार तास महामार्ग विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर महामार्ग बंद देखील करण्यात आला. मोठा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणाची होती? असा सवाल विचारला जात आहे. सुदैवाने फुल स्पीडमधून गाड्या जात असल्या तरी देखील कोणतीही दुर्घटना घडल्याचं समोर आलं नाही.