TRENDING:

'मरेपर्यंत तुझी साथ देईल त्याने प्रॉमिस पूर्ण केलं, पण आज तो नाहीये' 'सैराट'सारखी विद्याची रिअल स्टोरी

Last Updated:

गेल्यावर्षी प्रॉमिस डेला अमितने विद्याला मरेपर्यंत सोबत राहण्याचे प्रॉमिस केलं. ते प्रॉमिस पूर्ण ही केलं. मात्र ऑनर किलिंगच्या घटनेने प्रॉमिस पूर्ण पूर्ण होईल, असं वाटलं नव्हतं असं जढ अंतकरणाने विद्या सांगते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा आठवडा साजरा होतोय. या आठवड्यात तुम्ही अनेक प्रेम कहाण्या ऐकल्या असतील. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्या आणि अमितची जात या शब्दामुळे अपूर्ण राहिलेली ही प्रेम कहाणी. गेल्यावर्षी प्रॉमिस डेला अमितने विद्याला मरेपर्यंत सोबत राहण्याचे प्रॉमिस केलं. ते प्रॉमिस पूर्ण ही केलं. मात्र ऑनर किलिंगच्या घटनेने प्रॉमिस पूर्ण पूर्ण होईल, असं वाटलं नव्हतं असं जढ अंतकरणाने विद्या सांगते. कुटुंबाच्या इच्छेविरोधात आंतरजातीय विवाह केल्यामुळे नवरा गमवावा लागलेल्या विद्याची मनाला चटका लावणारी ही प्रेम कहाणी.
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगर भागामध्ये अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही हे दोघे राहत होते. विद्या आणि अमित यांचे वडील हे मित्र त्यामुळे त्या दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. 2023 मध्ये त्या दोघांची इंस्टाग्राम वरून चांगली मैत्री झाली आणि ते दोघे बोलत होते. त्याच मैत्रीचे रूपांतर त्यांच्या प्रेमामध्ये झालं. विद्याने अमितला प्रपोज केलं आणि अमितनेही तिला होकार दिला. त्यानंतर काही दिवस त्यांचं बोलणं झालं त्याच्या काही दिवसानंतर विद्याच्या घरी अमित आणि विद्या यांचे प्रेमप्रकरण समजलं.

advertisement

खरंच प्रेम आंधळं असतं! आत्मविश्वास आवडला अन् केलं लग्न, नेत्रहीन राहुल आणि देवता यांची वेगळी प्रेम कहाणी, Video

त्यानंतर विद्याच्या घरच्यांनी तिचा मोबाईल हा काढून घेतला आणि घराबाहेर जाणं बंद केलं. विद्याच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती जर तू काही चुकीचं पाऊल उचललं तर मी विष घेऊन माझा जीव देऊन टाकेल. त्यामुळे विद्याने घरच्यांच्या दबावामध्ये येऊन साखरपुडा केला. तेव्हा विद्याचं वय हे 18 वर्षे देखील नव्हतं. 2023 च्या व्हॅलेंटाईन वीक मधला जो प्रॉमिस डे असतो त्या दिवशी विद्याने अमितला संपर्क केला आणि त्याला सर्व सांगितलं की माझे घरचे माझे जबरदस्तीने लग्न लावून देत आहेत. पण मला त्या मुलाशी लग्न नाही करायचे. माझे तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे.

advertisement

विद्याचा वाढदिवस झाला त्यानंतर विद्या स्वतःच्या घरातून निघून आली. विद्या सकाळी सहा वाजता अमितच्या घरी आली. त्यानंतर अमितने त्याच्या आईला उठवून सांगितलं की आई ह्या मुलीला माझ्यासोबत लग्न करायचे. त्यानंतर दोघेही आळंदी या ठिकाणी गेले आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्माप्रमाणे लग्न केलं.

लग्नाच्या एका महिन्यानंतर ते दोघे संभाजीनगर येथे परत येतात. या ठिकाणी आल्यानंतर अमितच्या घरच्यांनी त्यांचं बौद्ध धर्माप्रमाणे लग्न लावून दिलं. त्या दोघांचा सुखाचा संसार चालू होता मात्र 2024 जुलै महिन्यामध्ये अमितचा मृत्यू झाला. विद्याचा वडिलांनी आणि चुलत भावाने त्याची हत्या केली.

advertisement

'माझा नवरा गेला याची मला खूप खंत आहे कारण की नवऱ्याची उणीव ही कोणीच भरून टाकत नाही. गेल्या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आम्ही सोबत साजरा नव्हता केला पण मला वाटलं होतं की या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आम्ही दोघं एकत्रपणे साजरा करू पण माझं ते स्वप्न अपूर्णच राहिलं. आता ते कधीही पूर्ण होणार नाही याची मला खूप खंत आहे', असं विद्या सांगते.

advertisement

त्या दिवशी काय घडलं?

ही घटना 14 जुलै 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. अमित साळुंखे नावाच्या 22 वर्षांच्या गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या किर्तीशाही हीने पळून जाऊन लग्न केलं होतं. विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगर मध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं होतं. 13 जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाचा एक महिना झाला होता. अमितच्या कुटुंबाने या आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने ते परत छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरा नगरमध्ये राहायला आले होते. मात्र मुलीच्या कुटुंबाने लग्न मान्य केलं नाही. याच रागातून वडिल आणि भावाने अमितचा काटा काढण्याचं ठरवलं. 14 जुलै रोजी जेवण झाल्यानंतर अमित पबजी खेळत होता, त्याचवेळी मित्रांनी त्याला बाहेर बोलावलं. बाहेर आल्यावर विद्याच्या वडिलांनी आणि चुलत भावाने अमितवर चाकू आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'मरेपर्यंत तुझी साथ देईल त्याने प्रॉमिस पूर्ण केलं, पण आज तो नाहीये' 'सैराट'सारखी विद्याची रिअल स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल