रिसोड (जि.वाशिम) येथील एका खासगी रुग्णालयात सुरेखा गणेश काबरा या महिलेवर 10 मे 2024 रोजी प्रसूती आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली. प्रसूती आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर, काही दिवसातच त्यांना पोट दुखी सुरू झाली, मात्र काही केल्यास ती थांबली नाही. त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. वाशिम येथे उपचारासाठी संबंधित डॉक्टरांनी मूत्राशयाचा त्रास असल्याचे सांगितले आणि त्यानुसार उपचार सुरू केले. मात्र या उपचाराने कोणताही दिलासा मिळाला नाही.
advertisement
कॅन्सर फक्त तंबाखूनेच नाही, तर 'या' कारणानेही होतो! वेळीच सावध व्हा, नाहीतर...
सततच्या वेदनांनी हैराण झाल्यानंतर सुरेखा यांनी छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली सोनोग्राफी व इतर तपासणीनंतर त्यांच्या पोटात परकं वस्तू असल्याचा संशय आला. तपासणीअंती गॉज पीस म्हणजेच ऑपरेशन दरम्यान येणारा कापडी तुकडा पोटातच विसरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
कपड्याचा तुकडा बाहेर काढला
इन कॅमेरा पद्धतीने तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे तो कपडा बाहेर काढण्यात आला, शस्त्रक्रियेदरम्यान 93 छायाचित्रे काढण्यात आली असून एमएलसी देखील दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पोटात राहिलेल्या कपड्यामुळे पू तयार झाला होता. या निष्काजीपणामुळे सुरेखा यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघड केला. सुरेखा यांचे भाऊ अमोल मुंदडा यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माझ्या बहिणी बरोबर जे झाले ते तर कुणासोबतही होऊ नये, त्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली आहे. रिसोड येथे गुन्हा दाखल होईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.






