पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अखेरीस राज्य सरकारने जवळपास सगळ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. जरांगेंनी उपोषण सुद्धा सोडलं असून मुंबईतून सगळे कार्यकर्ते बाहेर निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'सात्यत्याने लोक टीका करत असतात, जेव्हा टीका झाली तेव्हा मी विचलित झालो नाही. दोन समाजाला न्याय द्यायचा, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये वाद होणार नाही, दोन्ही समाज समोरासमोर येणार नाही, याचा विचार करून निर्णय घेतला. कायदेशीर निर्णय घेतला आहे. याचा निर्णय उपसमितीला दिला पाहिजे. त्यांनी खूप मेहनत घेतली. मला दोष दिला, शिव्या दिल्या. मी समाजासाठी कालही काम करत होतो, आजही करत होतो. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, किंवा इतर कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी माझं काम करणं मी कर्तृव्य समजतो. हे काम करताना तुम्हाला कधी शिव्या मिळतात तर कधी हारही मिळत असतो' असं म्हणत फडणवीस यांनी कुणावरही नाराजी नाही, असं स्पष्ट केलं.
advertisement
ओबीसी नेत्यांना आवाहन
'मला असं वाटतं साखळी उपोषणाची आवश्यकता नाही. ओबीसी समाजामध्ये गैरसमज होता, त्यांचं आरक्षण काढून इतर समाजाला देणार पण आता असं कुठेही होणार नाही. आता ओबीसी समाजाने आता आंदोलन परत घेतली पाहिजे. जोपर्यंत हे सरकार आहे दोन समाजामध्ये एकमेकांमध्ये आणणं त्यात तिढा आणणं, एकमेकांसमोर उभं करणे हे आम्ही कधीच करणार नाही. महाराष्ट्राचं सामाजिक विण आमच्यासाठी महत्त्वाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेही आभार मानतो. या निर्णयामध्ये दोन्ही नेते पाठीशी होते, दोन्ही नेते सोबत होते. पोलीस प्रशासनावर भरपूर तान पडला. कोर्टानेही आम्हाला सुचना केल्या आहेत. त्याचं पालन आम्ही करणार आहोत.
'मराठा समाजाला साखळी उपोषणाची गरज नाही'
मला असं वाटतं आता कोण काय करणार याबद्दल मी बोलू शकत नाही. मराठा समाजाला जे जे पाहिजे होतं ते ते दिलं आहे. याआधीही आरक्षण दिलं होतं. कोर्टामध्ये टिकलंही होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळीही काम केलं होतं. सारथी तयार केली. मराठा समाजाचा आयपीएसमध्ये टक्का वाढला आहे. नरेंद्र पाटील आर्थिक विकास मंडळ सक्षम केलं. दीड लाख मराठा लोकांना उद्योजक बनवलं आहे. शिष्यवृत्ती आणली आहे. ज्या ज्यावेळी मराठा समाजाला जे पाहिजे होतं,
रसद कोण पुरवली
मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यासाठी रसद कुणी पुरवली अशी चर्चा रंगली होती. पण आता चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळे आता जास्त खोलात जाण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी या तुम्हाला माहिती आहे, आता ते जाऊ द्या' असं म्हणत फडणवीस यांनी पुढे बोलण्यास नकार दिला.
विखे पाटील आणि मराठा उपसमितीचं अभिनंदन
"आज आनंद आहे, मराठा समाजाच्या आंदोलनावर समितीने चांगला तोडगा काढला. मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं आहे. हैदराबाद गॅझेट काढण्याबद्दल आमची भूमिका होती. आमची सुरुवातीपासून तयार होती. मनोज जरांगेंची सरसगटची मागणी होती, त्याबद्दल कायदेशीर अडचणी होती. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय होते सरसकट काढण्याचे होते. यासंदर्भात ही वस्तूस्थिती त्यांच्याही लक्षात आणून दिली. जरांगेंच्या टीमच्याही लक्षात आणून दिली. आपला कायदा आणि संविधानानुसार आरक्षण हे समुहाला नसतं तर व्यक्तीला असतं. हे जरांगेंना समजावून सांगितलं. त्यांनीही ते स्वीकारलं. जर कायद्यात बसत नसेल तर सरसकट करू नका. मग त्यातून एक मध्यम मार्ग काढला. त्यातून पुन्हा चर्चा सुरू केली. त्याचा जीआर तयार केला. त्यातील बद्दल केले, आता जीआरही काढला आहे. त्यामुळे एकूणच पहिल्यांदाच तर मला राधाकृष्ण विखे पाटील हे समितीचे अध्यक्ष होते आणि इतर सदस्य आणि मंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे, त्यांनी सात्यत्याने बसून चर्चा करून मार्ग काढला आहे. आता हा मार्ग काढला आहे. मुळात जे मराठवाड्यात राहणारे आहे. जे आमच्या मराठा समाजाचे लोक आहे, कधी काळी रक्त नात्यात कुणी असेल ज्यांचा कुणबी म्हणून उल्लेख असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. हैदराबाद गॅझेटियरनमुळे आता हे शक्य होणार आहे" असं म्हणत फडणवीस यांनी विखे पाटलांचं कौतुक केलंय.
मुंबईकरांची मागितली दिलगिरी
"ज्यांना आता पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळेल. आता ओबीसी समाजामध्ये भीती होती, सरसगट आरक्षण घेतील आणि इतर समाजही घुसण्याचा प्रयत्न करणार असं वाटतं होतं. आता तसं होणार नाही. आता ज्यांचा दावा आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळेल आहे. हा प्रश्न सगळ्यात मराठवाड्यात महत्त्वाचा होता तिथे रेकॉर्डच नव्हते. पण आता संवैधानिक तोडगा आम्ही काढला आहे, आता तो कोर्टामध्येही टिकेल. मंत्रिमंडळ समितीच्या कामावर मी समाधानी आहे. मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही फडणवीस म्हणाले.