दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 डिसेंबरला ख्रिसमस हा सण जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला नववर्षाच सेलिब्रेशन असणार आहे. या दोन्ही दिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी असते. एरवी ही हॉटेल नेहमीप्रमाणे 11 किंवा 12 वाजता बंद होतात. मात्र आता नाताळ आणि नववर्षाच स्वागत करण्यासाठी ही हॉटेल जास्तवेळ सूरू रहावी अशी मागणी नागरीक आणि हॉटेल मालकांकडून होत होती.
advertisement
विशेष म्हणजे येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील खाद्यगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची विनंती केली होती. जनरल सेक्रेटरी, इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन यांनी दिनांक १०.१२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास ही विनंती केली होती. या विनंतीला आता प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे.त्यामुळे आता नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑकेस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
प्रशासनाच्या या निर्णयाने पर्यंटकांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. त्याचसोबत नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.